spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सत्यजीत तांबे यांनी केले तरुणांना आवाहन

राज्याचे चित्र चिंताजनक असून इथे सर्व जाती धर्माच्या नावावर सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आपली परंपरा आहे. सध्या महाराष्ट्रात जाती धर्माचे राजकारण चालू आहे.

राज्याचे चित्र चिंताजनक असून इथे सर्व जाती धर्माच्या नावावर सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आपली परंपरा आहे. सध्या महाराष्ट्रात जाती धर्माचे राजकारण चालू आहे. या परंपरेला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. मात्र सद्यस्थितीत तरुणांचा वापर राजकीय स्वार्थासाठी सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. राजकारणी नेतेमंडळी सुद्धा या विषयात पुन्हा पुन्हा वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र तरुणांनी आता जागे व्हावे, चांगेल काय, वाईट काय ते बघावे, असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे त्यांच्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. त्यामळून ते बैठका घेत आहेत. याच बैठकीमध्ये सत्यजित तांबे यांनी युवकांशी संवाद साधला आहे. जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक घेतल्यानंतर त्यांनीप्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिक्षण विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार ते जाती धर्माच्या नावाने सुरु असणाऱ्या हिंसक आंदोलनात तरुणांचा सहभाग अशा विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली. सर्वच राजकीय पक्षांनी तरुणांचा राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप सत्यजीत यांनी केला असून तरुणांनी भरकटत न जाता, जागे व्हावे, चांगले वाईट ओळखावे असे आवाहन केले आहे. सत्यजीत तांबे यावेळी म्हणाले की, संगमनेरसह कोल्हापूरला झालेला प्रकार निंदनीयच आहे. मात्र, तरुणांचा वापर स्वार्थासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून केला जात आहे. औरंगजेबाचे फोटो अचानक झळकण्याला राजकीय वास असून अशाप्रकारचे प्रयोग हे कर्नाटक निवडणुकीपूर्वी झालेले आहेत. राजकारण्यांनाच फायदेशीर असतात, हे लक्षात घेऊन युवकांनीच असे प्रकार रोखणे आवश्यक असल्याचे मत नाशिक पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांनी साधलेल्या संवादात व्यक्त केले.

राज्यात सध्या घडत असलेल्या घडामोडी पाहता महाराष्ट्राच्या प्रतिमेला, परंपरेला गालबोट लागू नये, यासाठी तरुणांनीच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. तसेच कर्नाटक निवडणुकीपूर्वी देखील अशाच स्वरूपाचे काही प्रकार घडले होते. औरंगजेब हा काही आताच लोकांना माहित झालाय का? मग आताच त्याचे फोटो का झळकू लागले आहेत, त्याचा विचारदेखील तरुणाईने करणे आवश्यक असल्याचेही तांबे यांनी नमूद केले. तरुणांचा वापर राजकीय स्वार्थासाठी सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. या देशातील बेरोजगारी वाढत असताना त्याची चर्चा करायची सोडून अनावश्यक विषयांकडे भरकटत नेला जातो. त्यामुळे तरुणांनी भरकटत न जाता, जागे व्हावे, चांगले वाईट ओळखावे असे आवाहन केले आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांना आलेल्या धमकीवर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

शरद पवारांना आलेल्या धमकीवर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss