spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डोंबिवलीत शिवसेना शाखेत ठाकरे पिता-पुत्राचा फोटोकाढून, शिंदे पिता-पुत्राचा फोटो लावण्यावर दोन गटात वाद

डोंबिवली : डोंबिवलीतील शिवसेनाच्या शहर शाखेत नेत्यांचा फोटो लावण्यावरुन शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला. दोघांनी शाखेवर ताबा असल्याचा दावा करीत शाखेत ठाण मांडून बसले होते. एकीकडे राज्यात राजकारण तापले असताना दुसरीकडे शिवसेना कोणाची असे म्हणत वादाची ठिणगी पेटत आहे. तशातच डोंबिवली शाखेत दोन्ही गटाकांडून शिवसेना आमचीच असा दावा केला जात आहे. दुसरीकडे शाखा ताब्यात घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरु आहेत. डोंबिवलीच्या शिवसेना शाखेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे तसेच युवा नेते आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा फोटो होतो. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे समर्थकांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो काढला होता. त्यावरून वादाची सुरुवात झाली.

दिल्ली विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली

उद्धव ठाकरे यांचे समर्थक व एकनाथ शिंदे यांचे समर्थक यांच्यातील वाद वाढला आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर डोंबवली येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत लावण्यात आलेले एकनाथ शिंदे आणि त्याचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो उतरवण्यात आला होता. त्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर दोन्ही गटात राडा झाला. या सर्व गोंधळात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अखेर एकनाथ शिंदेंचा फोटो शाखेत लावला.

हेही वाचा : 

गद्दारांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत, आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांवर निशाणा

Latest Posts

Don't Miss