spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

World Test Championship Final चा चौथा दिवस परंतु आघाडी ऑस्ट्रेलियाकडेच

सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना सुरु आहे आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये दमदार लढत पाहायला मिळत आहे.

सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना सुरु आहे आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये दमदार लढत पाहायला मिळत आहे. आजचा दिवस हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दिवस आहे परंतु आतापर्यत ऑस्ट्रेलिया संघाचे पारडे जड दिसत आहे. या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद १२३ धावांची मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात १७३ धावांची आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना हा इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर सुरु आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे एकूण २९६ धावांची आघाडी आहे. सामन्याच्या सुरुवातील भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस रवींद्र जडेजाने दोन तर उमेश यादव आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक एक विकेट घेतला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मार्नस लाबुशेन ४१ तर कॅमरुन ग्रीन ७ धावांवर खेळत होते. त्याआधी या कसोटीत टीम इंडियानं पहिल्या डावात सर्व बाद २९६ धावांची मजल मारली आहे. भारताचे मराठमोळे अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूरने दमदार कामगिरी करून भारताच्या संघाची लाज राखली आहे. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी रचली आहे. त्यामुळे या दोघांनी भारतीय संघाला फॉलोऑनपासून वाचवले आहे. अजिंक्य रहाणेने १२९ चेंडूंमध्ये ११ चौकार तर एक षटकार ठोकत ८९ धावांची मजल मारली आहे. तर शार्दूल ठाकूरने १०९ चेंडूंमध्ये सहा चौकारांसह ५१ धावांची खेळी केली आहे.

त्यांनतर दुसऱ्या इंनिंगनंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला मोहम्मद सिराजने खिंडार पाडले आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू डेविड वॉर्नर याला अवघ्या एका धावेवर तंबूत पाठवले आहे. त्यानंतर उमेश यादवने उस्मान ख्वाजा याला १३ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला आहे. २४ धावांवर ऑस्ट्रेलियाचे २ फलंदाज बाद झाले आहेत. परंतु त्यांनतर २ खेळाडू बाद झाल्यानंतर स्मिथ आणि लाबूशेन या जोडीने चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार देत अर्धशतकी भागिदारी करत टीम इंडियाची डोकेदुखी वाढली होती. परंतु त्यांनतर भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथला ३४ धावांवर बाद करत जोडी फोडली. त्यानंतर धोकादायक ट्रेविस हेड १८ धावांवर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवरच बाद झाला. सध्या मार्नस लाबुशेन आणि कॅमरुन ग्रीन मैदानावर आहेत. ऑस्ट्रेलियाकडे 296 धावांची आघाडी आहे.

हे ही वाचा:

Sandipan Bhumre यांनी Chandrakant Khaire यांच्यावर केला सनसनाटी आरोप

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss