spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्रामध्ये कधी होणार मान्सुनचे आगमन?

सध्या राज्यामध्ये तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नागरिकांना दुपारच्या वेळेस उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे राज्यातील त्याचबरोबर देशामधील जनता सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

सध्या राज्यामध्ये तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नागरिकांना दुपारच्या वेळेस उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे राज्यातील त्याचबरोबर देशामधील जनता सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या कोकणामध्ये आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेसारखी जवळपास स्थिती निर्माण झाली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की, १५ जूनपर्यत अशीच स्थिती असणार आहे असे ते म्हणाले. १५ जूननंतर या वातावरणामध्ये कदाचित काहीसा फरक जाणवण्याची शक्यता आहे. १६ जूनपासून मान्सून गोव्यानंतर सिंधुदुर्ग जिल्यामध्ये प्रवेश करण्याची शक्यता माणिकराव खुळेयांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या उष्णतेमुळे तापमानामध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.

पुढे माणिकराव खुले म्हणाले की, सध्या जाणवणारी स्थिती म्हणजे ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे भागात बिपोरजॉय वादळातील अति बाहेरील परिघातून येणाऱ्या ताशी २५ ते ३० किमी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचा काहीसा अनुभव इतकाच काय तो वादळाचा परिणाम या भागात जाणवेल, असे खुळे यांनी सांगितले आहे. केरळमध्ये आदळणार मान्सून चार दिवस उशिराने येणार आहे असे सांगण्यात आले आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन १ जून ला होते पण ते ४ जून ला होणार आहे. त्यामध्येही कमी कधिक चार दिवसाचा फरक जेम्स धरून तो केरळमध्ये एक जून ते आठ जून या आठ दिवसांमध्ये कधी दाखल होण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे.

मान्सूनचे आगमन केरळमध्ये ८ जूनला झाले आहे. हा दाखल झालेला नैऋत्य मान्सून आगमनाच्या अटी पुर्ण करून दाखल झाला आहे. जवळपास कव्हर करून देशाच्या भुभागावर दाखल झाला आहे. बिपरजॉयचा प्रभाव येत्या ३६ तासांत देशातील चार राज्यांमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसपासच्या भागामध्ये ५० ते ६० किमी प्रतितास किनारपट्टीपासून मच्छिमारांना दूर राहण्याचा सल्ला भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

हे ही वाचा:

Sandipan Bhumre यांनी Chandrakant Khaire यांच्यावर केला सनसनाटी आरोप

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss