spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आजचे Petrol चे दर जाणून घ्या आणि विकेंड Long Trip साठी टॅंक फुल्ल करा!

शनिवार-रविवार हा सर्वांचाच सुट्टीचा वार असतो. अनेक मंडळी ही शहाराजवळी नैसर्गिक पर्यटन स्थळांवर जातात. तसेच अनेक ठिकाणी लॉन्ग ड्राईव्हचा प्लॅन करतात.

शनिवार-रविवार हा सर्वांचाच सुट्टीचा वार असतो. अनेक मंडळी ही शहाराजवळी नैसर्गिक पर्यटन स्थळांवर जातात. तसेच अनेक ठिकाणी लॉन्ग ड्राईव्हचा प्लॅन करतात. या विकेंडला देखील तुम्ही बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर पेट्रोल-डिझेलचे भाव जरुर जाणून घ्या. आज सकाळीच ६ वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनांचे दर जाहीर केले आहेत. जागतिक बाजारात कच्चा तेलात (Crude Oil Price) घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या १३ महिन्यात जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात भाव न वाढवल्याचे कारण पुढे करत नागरिकांचा खिसा कापण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Rate Today) कमी झाल्या नाहीत.

आज कच्चा तेलात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. १० जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल ७४. ७९ डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल ७०.१७ डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. गेल्या १५ महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव (Crude Oil Price) हे निच्चांकीस्तरावर आहेत. आपल्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसत आहे. जवळपास ३४५ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर १० रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारला एक लिटर पेट्रोलवर आकारल्या गेलेल्या करातून किती फायदा होतो ते समजून घेऊयात. जर १० जून रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव ९६.७२ रुपये असेल तर त्यात ३५.६१ रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत १९.९० रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत १५.७१ रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला ३.७६ रुपये कमिशन मिळते तर वाहतूकीसाठी ०.२० पैसा द्यावे लागतात.

हे ही वाचा:

का घेणार Adipurusha चित्रपटाचे १०,००० तिकीट Ranbir Kapoor? जाणून घ्या कारण

समृद्धी महामार्गावर परिवहन विभागाकडून मोफत टायर तपासणी केंद्र सुरू!

महाराष्ट्रामध्ये कधी होणार मान्सुनचे आगमन?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss