spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

City of Dreams साठी प्रिया बापटने केला मोठा त्याग! खुद्द अभिनेत्रीने केली खंत व्यक्त

प्रिया बापट हे नाव मराठी इंडस्ट्री सोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. प्रिया बापट हिने स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये मोठे स्थान निर्माण केले आहे.

प्रिया बापट (Priya Bapat) हे नाव मराठी इंडस्ट्री सोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. प्रिया बापट हिने स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये मोठे स्थान निर्माण केले आहे. प्रिया बापट ही अभिनेत्री विविध मालिकां सोबतच अनेक सिनेमांमध्ये झळकली आहे. प्रिया सध्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ सीरिजमध्ये राजकारणी महिलेच्या भूमिकेतून चाहत्यांच्या मनात घर करत आहे. प्रियाची ही भूमिका प्रत्येकालाच प्रचंड आवडली असून प्रत्येक जण प्रियाचे भरभरून कौतुक करत आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या मुलाखतीत प्रियाने इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या घराणेशाहीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे प्रियाची सर्वत्र चर्चा होत आहे.

झालेल्या मुलाखतीत प्रिया बापट घराणेशाहीबद्दल म्हणाली की, ‘घराणेशाहीकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन हा खूप वेगळा आहे. मला असं वाटतं की ज्या कुटुंबाची मुले इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छितात किंवा जे लोक त्यांना ब्रेक देण्यास तयार आहेत त्यांना प्रश्न विचारणे योग्य नाही. साहजिकच माझा संघर्ष, प्रवास आणि त्यांचा प्रवासात फरक दिसतो. माझ्यापेक्षा त्यांना खूप वेगाने संधी मिळतात हे तथ्य आहे. पण, मला वाटते की जो प्रतिभावान असेल तोच इंटस्ट्रीमध्ये टिकून राहिल…’ तसेच पुढे, ‘मी गेल्या २० वर्षांपासून माझ्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. ‘सीटी ऑफ ड्रीम्स’ मिळण्यासाठी मला प्रचंड काळ लागला. गेल्या वर्षीपासून मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. इंडस्ट्रीमध्ये बाहेरून आलेल्या कालाकारांना स्थायिक होण्यासाठी आणि ते कोण आहेत आणि त्यांच्या प्रतिभेवर विश्वास ठेवण्यास लोकांना वेळ लागतो…’ अशी खंत देखील प्रियाने मांडली.

‘हा माझा प्रवास आणि आणि त्यांचा प्रवास वेगळा असू शकतो… हे दोन भिन्न प्रवास आहेत…’ असं देखील अभिनेत्री प्रिया बापट मुलाखतीत म्हणाली. पौर्णिमा गायकवाड म्हणून अभिनेत्री प्रिया बापट हिने चाहत्यांच्या मनात स्वतःच घर निर्माण केलं आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ नंतर प्रिया बापट हिच्या लोकप्रियतेत देखील प्रचंड वाढ झाली आहे.‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या दोन सीझनला ज्याप्रमाणे चाहत्यांनी प्रतिसात दिला, त्याचप्रमाणे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीरिजला देखील प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये प्रिया बापटने साकारलेल्या भूमिकेच सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

हे ही वाचा:

खरंच केली का ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी Ball tempering? पाकिस्तानचा माजी खेळाडू Basit Ali चे आरोप

Biparjoy Cyclone चा महाराष्ट्रासह अन्य ४ राज्यांना धोका, ३६ तासात वादळ होणार आणखी तीव्र!

का घेणार Adipurusha चित्रपटाचे १०,००० तिकीट Ranbir Kapoor? जाणून घ्या कारण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss