spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

श्रीकांत शिंदे यांना आता प्रत्येक सीटसाठी संघर्ष करावा लागणार राऊतांचा दावा

कल्याण-डोंबिवली मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये तू तू मै मै सुरु झाली आहे. मतदारसंघामधील खासदारांनी शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांनी तर खासदारकी रद्द करण्याचा राजीनामा देण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीला दिला आहे.

कल्याण-डोंबिवली मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये तू तू मै मै सुरु झाली आहे. मतदारसंघामधील खासदारांनी शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांनी तर खासदारकी रद्द करण्याचा राजीनामा देण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीला दिला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षामधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्याचबरोबर भाजप शिंदे गटावर कुरघोडी करत असल्याचे दिसून आले आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांना तिकीट दिले. दोनदा निवडून आणले आहे शिंदेच्या पुत्राचे उद्धव ठाकरे यांनी फाजील लाडच केले आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीची जागा शिवसेनेशी कोणताही संबंध नसताना पक्ष कार्याशी कोणताही संबंध नसताना श्रीकांत शिंदे यांना दिली गेली होती. त्यासाठी गोपाळ लांडगे यांची दिलेली उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा हे लाड केले होते. श्रीकांत शिंदेंना दोन वेळा तिकीट देऊन दोनदा निवडून आणले आहे. आता त्यांना त्याचा संघर्ष करू द्या. आता श्रीकांत शिंदेंना संघर्ष करू द्या. आता प्रत्येक जागेसाठी भाजप त्यांना रडवल्याशिवाय राहणार नाही. शिंदे गट आता भाजप सोबत आहे आता त्यांनी वेगळा गट तयार केला आहे. भाजपकडे गुलामी करत आहेत. २५ वर्ष आमची त्याच्याशी युती होती. जेव्हा आमची युती होती तेव्हा प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचे नेते आमच्यासोबत जागेसाठी संघर्ष करायचे असे संजय राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले की, शिवसेना आता संघर्षातून जात आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत नातं का तोडलं हे त्यांना कळले आहे. आनंद दिघे हे आमचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. त्यावेळी कल्याणची जागा आम्ही खेचून घेतली होती. आमचा गड आहे आम्ही लढणार म्हणून आम्ही ती जागा भाजपकडून घेतली होती. भाजपकडून त्यावेळी रॅम कापसे निवडणूक लढवायचे परंतु आता श्रीकांत शिंदे यांना प्रत्येक सीटवर त्यांचा असाच संघर्ष होईल, असा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा:

Sandipan Bhumre यांनी Chandrakant Khaire यांच्यावर केला सनसनाटी आरोप

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss