spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लव्ह जिहादवर पंकजा मुंडे यांनी दिले स्पष्टीकरण

गेल्या काही महिन्यांपासून लव्ह जिहाद सारखी प्रकारे धुळाकुळ घालत आहे आणि राजकारणी देखील या मुद्याकडे लोकांचं लक्ष खेचून घेत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून लव्ह जिहाद सारखी प्रकारे धुळाकुळ घालत आहे आणि राजकारणी देखील या मुद्याकडे लोकांचं लक्ष खेचून घेत आहे. राजकारणात या संदर्भात या मुद्यांना हात घालण्या पॆक्षा लोकांच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष दिले गेले पाहिजे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ‘लव्ह जिहाद’वर भाष्य केले आहे. धर्मांतराच्या कथित कटाच्या नावाखाली आंतरधर्मीय विवाहाला काही घटकांकडून होत असलेल्या विरोधावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले.पंकजा मुंडे म्हणाल्या, “…मला वाटतं प्रेम म्हणजे प्रेम आहे. प्रेमाला भिंती दिसत नाहीत. जर दोन माणसं निव्वळ प्रेमातून एकत्र आली असतील तर त्याचा आदर केला पाहिजे. पण त्यामागे काही कटुता आणि कारस्थान असेल तर त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं पाहिजे.”

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही विशेष जनसंपर्क अभियानांतर्गत जबलपूरमध्ये मोदी सरकारच्या गेल्या नऊ वर्षांतील कामगिरीची नोंद केली. पंकजा मुंडे यांना वाढत्या लव्ह जिहादबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, गरीब कल्याण आणि विकास हा नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अजेंड्यावर राहिला आहे. जर कोणावर प्रेम असेल तर त्याला प्रेम करू दिले पाहिजे, प्रेमात कोणतीही भिंत नसावी पण त्यात काही कट कारस्थान असेल तर ते वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाईल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना कधी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हटले, या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज त्या मंत्रीही नाहीत, त्या फक्त भाजपच्या सचिव आहेत. वडिलांप्रमाणे पक्षाची सेवा करत असल्याचे त्या म्हणाल्या. महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या ‘मुख्यमंत्री लाडली बहना योजने’चेही मुंडे यांनी कौतुक केले. भाजपच्या या योजनेला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आणलेल्या १५०० रुपयांच्या नारी सन्मान योजनेचा प्रभावही त्यांनी नाकारला.

हे ही वाचा:

सगळं काही भाजपचंच

मला केंद्रातल्या राजकारणात रस नाही – अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss