spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive INTERVIEW : नारायण राणेंचे कर्तृत्व उध्दव ठाकरे पण मान्य करतील- संजय राऊत

महाराष्ट्राच्या सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहे. प्रत्येक पक्षाकडून आगामी निवडणुकीच्या बैठक देखील घेण्यात येत आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सगळ्याच पक्षामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक पक्षाकडून पक्षांतर्गत राजकारण सुरु आहे. आगामी लोकसभा तोंडावर असतानाच प्रत्येक पक्षामध्ये रणनीती ही आखली जात आहे. महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये राजकारण तापलं असताना शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली. त्या पाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील लक्ष्य करण्यात आले आहे. दिल्ली पासून महाराष्ट्रापर्यंत राजकीय हवा तापली असतानाच TIME Maharashtra चे संपादक राजेश कोचरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांपासून ते त्यांच्या मुलापर्यंत आणि शरद पवारांपासून ते मोदींपर्यंतच्या विषयांवर अधिकारवाणीने भाष्य केले आहे.

मुलाखतीपर संवाद साधत असताना संजय राऊत यांनी अणे मुद्द्यांना हात घातला आणि अनेक विषयावर त्यांनी भाष्य देखील केले परंतु नारायण राणे यांच्याविषयी विचारणा केली असता,संजय राऊत यांच्या सोबत राजकारणाविषयी बोलत असताना त्यांनी नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले हे अनपेक्षित होते आणि त्यामुळे आम्हाला धक्काच बसला होता.तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी देखील तो धक्काच होता. असे त्यांनी उघडपणे सांगितले. कारण ते कट्टर शिवसैनिक तर होतेच. नारायण राणे यांनी शिवसेनेमध्ये ३९ वर्षे काम केले. तसेच नारायण राणे हे शिवसेने मधले महत्वाचे नेते होते. त्यांनी ३९ वर्ष हि शिवसेनेसाठी वाहिली आणि शिवसेना उभी करण्यात त्यांचा देखील मोलाचा वाट होता हे संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांनी सांगितले की , नारायण राणे यांनी पक्षासाठी आणि आणि पक्षवाढीसाठी काम केले आणि ते तेवढेच महत्वाचे देखील होते.शिवसेनेच्या जडणघडणीत , प्रवासात नारायण राणेंचं महत्वाचं योगदान तेवढाच छगन भुजबळांचा देखील आहे.

जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी सामनाच्या समोर सभा घेण्याचा प्रयत्न देखील केला होता परंतु ती सभा काही सफल होऊ शकली नाही आणि त्या सभेसंदर्भात अजून देखील खटलेआणि कोर्ट काचेऱ्या सुरूच आहे. परंतु असाच काहीसा प्रयोग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मारत देखील करण्यात आला. यावर संजय राऊत यांनी विरोधकांना किंवा आपण म्हणू शकतो सरकारच्या चांगलीच चपराक मारली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कडून नागूसायाची वाडी येथे सद्गुरुदर्शन इमारतीच्या इथे सभा घेतली कार्यक्रम घेतला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले नारायण राजे हे मोठे आणि महत्वाचे नेता आहेत अशा टिल्ली – पिल्ली लोकांकडून सभा घेऊन काही फरक पडत नसतो. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी कितीही सभा लावल्या तरी काही होऊ शकत नाही. असे देखील ठाम मत यावेळी संजय राऊत यांनी मांडले.

त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील योगदानासंदर्भात विचारले असता, छगन भूकबळी, नारायण राणे यांचा उदाहरण देत एकनाथ शिंदे यांचा काही योगदान नाही. असा टोला देखील त्यांनी लगावला. शिंदे हे पुढच्या पिढीतील नेते आहेत . शिवसेनेसाठी खरे आणि निष्ठावंत कामकारणारे हे नारायण राणे , छगन भुजबळ आणि इतर काही नेते आहेत त्यांनी शिवसेनेला मोठे केले. त्यामुळे शिंदेंचा योगदान हे काहीच नाही यावर ते ठाम होते. तसेच संजय राऊत यांनी मोठं दावा केला की ,एकनाथ शिंदे हे गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून पक्ष सोडणार अशी कुणकुण लागली होती. तसेच एकनाथ शिंदे हे अस्थिर मनाचे नेते आहेत. असे देखील संजय राऊत म्हणाले. काही लोकांच्या मते , पृथ्वीराज चौहान मुख्यमंत्री असताना जायला निघाले होते, अहमद पटेल याना भेटायला गेले असे म्हणतात. यात किती तथ्य आहे हे मला जाणून घ्यायचे नाही.

परंतु एक मात्र निश्चित पाने सांगतो, जेव्हा नारायण राणे शिवसेनेत होते, तेव्हा त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले. बाकी कोणत्याच पक्षातून त्यांना मुख्यमंत्री पद अजून पर्यंत मिळाले नाही; तर छगन भुजबळआवाजही असते तरी त्यांना देखील पद मिळाले असते. आणि मी आज ठामपणे असे देखील सांगतो की , एकनाथ शिंदे हे देखील काही काळ थांबले असते, त्यांच्या इच्छा व आकांशा नक्कीच पूर्ण झाल्या असता असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला. परंतु सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी शिवसेनेचे भगदाड केलं पक्ष फोडल्या नंतर गद्दार झाल्यानंतर पक्ष फुटावा हे ध्येय मनात घेऊन ते गुजरातच्या २ नेत्यांसोबत दिल्ली येथे जाऊन बसल्यामुळे ते मुख्यमंत्री झाले. पण तरी देखील नाव शिवसेनेचे आहे. त्यामुळे सत्तेची कधीच लालसा करु नये. आणि गद्दार बनून काहीच मिळत नाही.तसेच ज्यांच्या कडे अधिक पैसे असतो त्यांना चौकशीची भीती असते. आणि म्हणूनाच आपल्याला संरक्षणाची गरज भासते असे देखील संजय राऊत यांनी संगीतले. मी सरकार मधून बाहेर पडलो आणि माझे संरक्षण काढण्यात आले परंतु अजून देखील कोणी माझे काही वाकडे करू शकले नाही कारण आम्ही खरे आहोत.

हे ही वाचा:

EXCLUSIVE INTERVIEW : महाराष्ट्राच्या राजकारणात चक्रीवादळ आणणारी Sanjay Raut यांची तुफानी मुलाखत!

वाढदिवसानिमित्त मनसे राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss