spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Aditya Thackeray Birthday Special: असा झाला आदित्य ठाकरेंचा राजकीय प्रवास..

ठाकरे घराण्याचे ज्येष्ठ चिरंजीव आदित्य ठाकरे राजकारणात रुजू लागले आहेत. तरुणाईमध्ये आदित्य ठाकरे बरेच चर्चेत असतात.

ठाकरे घराण्याचे ज्येष्ठ चिरंजीव आदित्य ठाकरे राजकारणात रुजू लागले आहेत. तरुणाईमध्ये आदित्य ठाकरे बरेच चर्चेत असतात. युवा नेते आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. आदित्य ठाकरे यांनी देखील त्यांच्या आजोबांच्या आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे जरी त्यांच्या वकृत्वामुळे प्रसिद्ध नसले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू आहे. उत्तम संघटन कौशल्य त्याचबरोबर अभ्यासू कौशल्य यांच्या जोरावर त्यांनी राजकारणात स्वतःचे नाव प्रस्थापित केले आहे. अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या या युवा नेत्याचा जन्म १३ जून १९९० साली झाला. आदित्य ठाकरे यांचे शालेय शिक्षण हे बॉम्बे स्कॉटिश स्कूल मधून झाले असून सेंट झेवियर्स या कॉलेज मधून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी केसी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. फार कमी जणांना माहित आहे कि आदित्य ठाकरे हे कवी आणि गीतकारही आहेत.ठाकरे घराणं आणि कला यांचं एक अतूट नातं आहे. २००७ साली त्यांचा इंग्रजी कवितांचा माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक हा कवितांचा संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांचा उम्मीद हा गीतांचा अल्बम (Album) सर्वत्र प्रदर्शित झाला. अशा या युवानेत्याचा राजकीय प्रवास कसा सुरु झाला याबद्दल जाणून घेऊया.

आदित्य ठाकरे यांचे पणजोबा प्रबोधनकार ठाकरे हे एक आपल्या समाजाला लाभलेले थोर समाजसुधारक होते. तसेच आदित्य ठाकरे यांचे आजोबा भारत देशातील महान नेते होते. त्याशिवाय वडील उद्धव ठाकरे देखील राजकारणी असून आदित्य ठाकरे यांना घरातच राजकारणाचे धडे मिळत गेले. लहानपणापासूनच हिंदवीहृदयसम्राट बाळासाहेबांचे विचार आदित्य ठाकरे यांना मिळाले. २०१० हे वर्ष आदित्य यांच्यासाठी अगदी खास होते. २०१० साली आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच आंदोलन केले होते. यावेळी ते मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असून त्यांनी हे आंदोलन अनिवासी भारतीय रोहिंग्टन मिस्त्री यांच्या सच अ लॉन्ग जर्नी या पुस्तकाविरोधात पुकारले होते. आपल्या मराठी भाषेबद्दल अपमानकारक उद्गार काढल्याने हे आंदोलन केले होते. याचवर्षी म्हणजे २०१० साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युवा सेनेची घोषणा केली. दसरा मेळाव्याच्या दिवशी ही घोषणा करत त्यांनी जवळजवळ हजारोलोकांच्या साक्षीने युवा सेनेची संपूर्ण जबाबदारी नातू आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केली. आणि याच दिवसापासून आदित्य ठाकरे यांनी राजकारणात पाऊल टाकले. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेने जवळजवळ सर्वच जिंकल्या होत्या.

आदित्य ठाकरे यांनी हळू हळू मुंबई महानगरपालिकडे देखील लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या वडिलांना खंबीर साथ देण्यासाठी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या तसेच विधानसभेच्य प्रचाराला देखील सुरुवात केली. आदित्य ठाकरे हे समाजकार्यात देखील कधीच मागे पडले नाही. त्यांनी अनेक गोगरिबांना, दुःषकाळग्रस्तांना मदत केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरे याणी २०१९ साली वरळी मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी आदित्य ठाकरे हे एकूण ६७ हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले. त्यानंतर पुढे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यावर ३० डिसेम्बर २०१९ रोजी आदित्य ठाकरे यांच्यावर पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

हे ही वाचा:

EXCLUSIVE INTERVIEW : महाराष्ट्राच्या राजकारणात चक्रीवादळ आणणारी Sanjay Raut यांची तुफानी मुलाखत!

वाढदिवसानिमित्त मनसे राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss