spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

७० हजार तरुणांना मिळणार सरकारी नियुक्तीपत्र!

केंद्र सरकारद्वारे आज देशभरात ४३ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान ७० हजार तरुणांना नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे वितरित करणार आहेत.

मोदी सरकारला गेल्या महिन्यात ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. लवकरच मोदी सरकारचे दुसऱ्या सत्रातील कार्यकाल संपणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या बाजूने एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. ‘हर हर मोदी, घर घर मोदी’, ‘अच्छे दिन आएगे’ ही ब्रीदवाक्य घराघरात पोहोचली होती. त्यानंतर मोदी सरकारने अभूतपूर्व असा विजय मिळवला होता. विशेष म्हणजे तोच करिष्मा पुढच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही जपून ठेवण्यात भाजपला यश मिळाल . या ९ वर्षाच्या कालावधीत मोदींद्वारे भाजपने अनेक विकास कामे केली. आज १३ जून रोजी देशातील तरुणाईंसाठी मोदींनी आनंदाची बातमी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी, मंगळवारी देशातील तब्ब्ल ७० हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे वितरित करणार आहेत. तसेच रोजगार मेळा उपक्रमांतर्गत यात भेटींच वितरण करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये पीएम मोदींनी यासंदर्भात घोषणा देखील केली होती. पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये १० लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात येतील, असं त्यावेळी मोदींनी आश्वासन दिल होत. दिलेलं आश्वासन पूर्ण करत आज मोदी व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे ७० हजार तरुणांना नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे वितरित करणार आहेत.

केंद्र सरकारद्वारे आज देशभरात ४३ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान ७० हजार तरुणांना नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे वितरित करणार आहेत. सकाळी बरोबर १०:३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याची सुरवात करणार आहेत. या मेळाव्या अंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये भरती केली जात आहे. वित्तीय सेवा विभाग, पोस्ट विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, महसूल विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, गृह मंत्रालय यासह अनेक विभागांमध्ये नवीन भरती करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हितासाठी तसेच भारताच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या तसेच अनेक विकासकामे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात १५ ऑगस्ट २०१४ रोजी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना जनधन योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर २८ ऑगस्ट २०१४ ला या योजनेचा शुभारंभ झाला. यासारख्या अनेक योजनांची घोषणा नरेंद्र मोदींनी केली आहे.

हे ही वाचा:

Registration Certificate साठी नव्या Technology चा पहिल्यांदाच होणार वापर

आजचे राशिभविष्य, १३ जून २०२३ , आजचा दिवस…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss