spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजपकडून निवडणुकांच्या रिंगणात कोण उतरणार

सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या चर्चा रंगाच्या आहेत याचदरम्यान आगामी काळातील लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या चर्चा रंगाच्या आहेत याचदरम्यान आगामी काळातील लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीकडून राजकीय समीकरणांबरोबरच जातीय समीकरणे सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पक्ष नेतृत्वाकडून एक मोठा निर्णय पक्ष नेतृत्वाकडून घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणूका तोंडाशी आल्या आहेत त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्यास पूर्व मंत्री आणि खासदारांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्या मंत्र्याना भाजपकजडून निवडणूक लढवण्याची संधी मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून जे खासदार केंद्रामध्ये मंत्रिपद भूषवणार आहे त्यांना लोकसभा २०२४ च्या निवडणुकांसाठी सार्वत्रिक लोकसभेच्या जागांसाठी मतदारसंघ निवडण्याच्या सूचना दिल्या आहेत. एवढेच नाही तर अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना देखील या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीकडून कोण निवडणुकांच्या मैदानात उतरणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

हे भाजपचे मंत्री लढवणार मतदारसंघातून निवडणुक –

  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तमिळनाडूमधून निवडणुकांच्या रिंगणात उतरु शकतात.
  • परराष्ट्रमंत्री डॉ सुब्रह्मण्यम जयशंकर हे देखील तमिळनाडू मतदारसंघाची निवड करु शकतात.
  • वाणिज्य आणि उद्याोग मंत्री पीयूष गोयल हे महाराष्ट्रातून निवडणुकांच्या मैदानात उतरु शकतात.
  • केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे – महाराष्ट्र
  • केंद्रीय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल – आसाम
  • केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया – मध्य प्रदेश
  • केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव – ओडिशा
  • केंद्रीय पेट्रोलियम,गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी – पंजाब किंवा जम्मू काश्मीर
  • केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया – गुजरात
  • केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव – हरियाणा किंवा राजस्थान
  • केंद्रीय मत्स्य उत्पादन आणि पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रुपाला – गुजरात

हे ही वाचा:

Registration Certificate साठी नव्या Technology चा पहिल्यांदाच होणार वापर

Aditya Thakare यांच्या वाढदिवसानिमीत्तकेलेल्या जीवनदानाबद्दल तुम्हला माहित आहे का? …

Rinku Singh आणि Yashasvi Jaiswal ला मिळणार का भारतीय संघामध्ये स्थान?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss