spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बाळासाहेबांनी राज ठाकरेंच्या शाळेत जाऊन असे काही केले की व्हाल थक्क

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या उत्कृष्ठ वक्तृत्व शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. राज ठाकरे हे प्रख्यात संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि कुंदाताई ठाकरे यांचे सुपुत्र.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या उत्कृष्ठ वक्तृत्व शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. राज ठाकरे हे प्रख्यात संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि कुंदाताई ठाकरे यांचे सुपुत्र. संगीतकार श्रीकांत शिंदे यांचे भाऊ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असून ते राज ठाकरे यांचे काका. ठाकरे घराणे आणि कला यांचे एक अतूट नाटक आहे. राज ठाकरे यांनी आपल्या काकांप्रमाणे व्यंगचित्रकलेचा कला आत्मसात केली आहे. बाळासाहेबांच्या सावलीत राहून राज ठाकरे यांनी राजकारणाचे धडे गिरवले. उत्तम वक्तृत्व आणि प्रभावी नेतृत्व असलेल्या कौशल्यामुळे राज ठाकरे हे तरुणांमधले सर्वात लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. राज ठाकरे यांचे भाषण हे प्रचंड प्रसिद्ध असून त्यांचे दर्जेदार भाषण ऐकण्यासाठी लाखो लोक गर्दी करतात. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाविषयी अधिक माहिती आत्मसात केली आहे. राज ठाकरे यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांसोबत अनेक किस्से आहेत. असा एक किस्सा राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे यांनी सांगितला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक महाराष्ट्रातील दर्जेदार व्यक्तिमत्व असलेले नेते होते. त्यांच्या कोणतीही गोष्ट अथवा विचार मांडण्याचा अंदाज हटके होतात. बाळासाहेबांच्या बोलण्यात आपलेपणा सोबतच राग आणि चीडही असायची. बाळासाहेबांचा दरारा एवढा होता की मोठ्यातला मोठा माणूसही त्यांना घाबरायचा. बाळासाहेबांच्या एका बोलण्यावर संपूर्ण मुंबई थांबायची. मात्र तुम्हाला माहित आहे का बाळासाहेबांचा हा दरारा हा फक्त मुंबई आणि राजकारणातच नाही तर राज ठाकरे यांच्या शाळेतही तेवढाच होता.

बाळासाहेबांच्या किस्सा सांगताना राज ठाकरे म्हणाले, मी शाळेत असताना एका मुलासोबत भांडण झाले. आणि म्हणूनच आमच्या शिक्षकाने शिक्षा म्हणून दोघांना गॅलरी मध्ये शाळा सुटे पर्यंत उभं केलं. आणि शाळा सुटल्यावर बाई म्हणाल्या की उद्या पालकाना बोलव. दुसऱ्या दिवशी मी आई ला घडलेला प्रकार सांगून तुला शाळेत बोलावले आहे असे सांगितले. दुसऱ्यादिवशी मी शाळेत गेलो आणि दहा मिनिटात शिपाई म्हणाला ठाकरे बोलवलंय. मला वाटले आज परत दिवसभर बाहेर उभं करतायत की काय. मी त्या शिपायाच्या पाठीमागून चालत गेलो. बापूसाहेबांनी खोली पार करून आम्ही दादासाहेब रेगे यांच्या खोलीत गेलो. मला वाटले आता शाळेतून काढूनच टाकतायत की काय. खोलीमध्ये जाऊन बघितलं तर दोन्ही वर्ग शिक्षिका तिथे रडत होत्या. आणि त्यांच्या समोर बाळासाहेब बसले होते. माझे वडील बसले होते. दादासाहेब रेगे त्या शिक्षिकांना ओरडत होते. बापूसाहेब रेगे बाजूला उभे होते. हे सांगून राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा किस्सा सांगत जुन्या आठवणी काढल्या.

हे ही वाचा:

शिवसेनेकडून जाहिरातबाजी : कोणता नेता आहे अधिक लोकप्रिय ?

या आंब्याची किंमत ऐकून भुवया होतील आश्चर्याने उंच …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss