पुणे : शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. कात्रज चौकात ठाकरे समर्थकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असताना यादरम्यान उदयसामध्ये देखील दगडूशेठ गणपती मंदिराच्या दिशेने जात होते. याचवेळी ठाकरेंच्या समर्थकांनी सामान त्यांच्या गाडीवर हल्ला केला या हल्ल्यात गाडीतील एक व्यक्ती जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
काल मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुणे दौऱ्यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेत असू शकतात मात्र,अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही.अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही.
— Uday Samant (@samant_uday) August 3, 2022
उदय सामंत हल्ल्या प्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी संजय मोरे यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केले. चौकशी दरम्यान आणखीन काही लोकांचा यात सहभाग असल्याची माहिती मिळाली. आणि हा हल्ला शिवसैनिकांकडून करण्यात आला असल्याचे समोर आले. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे दगड मारून पळून जाणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे दोघे एकाच दिवशी पुणे दौऱ्यावर आहेत. एका शहरात, एकाच दिवशी ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना आमने-सामने येणार असल्याच्या चर्चेला उधाण आसे होते. आदित्य ठाकरे यांची देखील कात्रजमध्ये सभा होती. त्यामुळे हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचे बोलले जात आहे.