spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, शिवसेनेकडून प्रतिज्ञापत्र दाखल

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शिवसेनेचा सत्तासंघर्ष सुरूच आहे. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी होणार आहे. 1 ऑगस्टला न्यायालयानं हे प्रकरण विस्तारित पीठाकडं द्यायचं की नाही, याचा निर्णय आज करण्याची नोटिफिकेशन जारी केली होती. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात शिंदे सरकारवर काय फैसला देणार याकडे संपूर्ण राज्याच लक्ष असणार आहे. देशाचे सरन्यायाधिश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेनेकडून शिंदे गटा विरोधात तब्बल चार याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिके वरती गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. त्यावेळेस दोन्ही बाजूने घमसान युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही पक्षांना पुढची तारीख 1 ऑगस्ट अशी दिली होती. मात्र या तारखेत बदल होऊन ही सुनावणी तीन ऑगस्टवरती गेली. आता आज शिंदे सरकारचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

हेही वाचा : 

उदय सामंत हल्ल्याप्रकरणी पुण्याचे शिवसेना शहर प्रमुकांसह पाच जणांना अटक

Latest Posts

Don't Miss