spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चुकीच्या Injection मुळे लहानमुलीचा मृत्यू, रुग्णालयावर कुटुंबीयांचा आरोप!

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक भोईवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून परिस्थिती आटोक्यात पूर्णपणे आणली

भिवंडी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार वर्षीय मुलीचा चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाला आहे. या मृत्यूस डॉक्टर, परिचारिका,रुग्णालय व्यवस्थापक यांना जबाबदार ठरवत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. तसेच नातेवाईकांकडून डॉक्टर परिचारिका यांना मारहाण सुद्धा करण्यात आली. आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना शोक अनावर झाला आहे.

राम नगर परिसरात राहणारे नितीन कांबळे यांची चार वर्षीय मुलगी श्रद्धा हिला उलट्या होत असल्याने उपचारासाठी भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड येथील सनलाईट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. रात्री आठ वाजताच्या सुमारास श्रद्धा हीची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्रद्धाला सलाईनमधून इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर श्रद्धा पूर्णतः बेशुद्ध पडली व काही वेळातच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हे समजताच रुग्णालयात असलेल्या श्रद्धाच्या नातेवाईकांनी तांडव सुरू केला. तसेच नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टर आणि परिचारिकेला मारहाण सुद्धा केली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक भोईवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून परिस्थिती आटोक्यात पूर्णपणे आणली व त्यानंतर श्रद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करत अकस्मात मृत्यूची नोंद केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे. इंजेक्शनचे तीन डोज लागोपाठ दिल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच डॉक्टरांवर कायदेशीर कारवाही करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तर रुग्णालयात तोडफड प्रकरणी डॉक्टरांनी नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून भोईवाडा पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. या घडलेल्या संपूर्ण प्रकरणा संबंधित हॉस्पिटलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

हे ही वाचा:

शंभूराज देसाई यांनी केली मोठी घोषणा

रील बनवताना तरुण पडला विहिरीत; ३२ तासांच्या शोधा नंतर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss