spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल…; हल्ल्यानंतर उदय सामंतांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल रात्री शिवसैनिकांनी कात्रज चौकात हल्ला केला. शिवसैनिकांनी सामंत यांच्या गाडीभोवती घेराव घातला, दगडफेकीत सामंत यांच्या गाडीची काच फुटली. पुण्यातील कात्रज भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी आले होते. कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा मंगळवारी रात्री पार पाडली. शिंदे यांच्यासह सामंत आले होते त्यावेळीच हा हल्ला झाला. मात्र आता या हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर सामंत यांनी थेट शिवसेनेला इशारा दिलाय. सामंत यांनी ट्विटरवर व माध्यमांशी बोलताना प्रकरणाचा खुलासा करत इशारा दिला आहे.

उदय सामंत म्हणाले, “हल्ला करणारे शिव्या देत होते, आमच्या आयाबहिणींचा उद्धार करत होते. या हल्लेखोरांच्या हातात दगड बांधलेले होते, त्यांनी काच फोडली, गाडीच्या बोनेटवर उभे राहिले. राजकारण किती खालच्या थराला जात आहे त्याचंच हे प्रतिक आहे. राज्याच्या जनतेसमोर संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. सोज्वळ चेहऱ्यामागचे हे प्रकार काल जनतेने पाहिले आहेत. असे सामंत म्हणाले.

उदय सामंत हल्ल्याप्रकरणी पुण्याचे शिवसेना शहर प्रमुकांसह पाच जणांना अटक

सामंत यांनी आपल्या ट्विटर हान्डेलवरुन म्हटले, “गद्दार म्हणता तरी शांत आहे. शिव्या घालता तरी शांत आहे. आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही. काळ ह्याला उत्तर आहे. अंत पाहू नका,” असे ट्विट करत उदय सामंत यांनी शिवसेनेला इशारा दिला.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, शिवसेनेकडून प्रतिज्ञापत्र दाखल

Latest Posts

Don't Miss