spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shravan 2023, यंदा श्रावण महिना वाढणार… जाणून घ्या सविस्तर

हिंदू धर्मात प्रत्येक महिना हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केला जातो. पूर्वीपासून श्रावण महिना (Shravan) हा शिवभक्तीचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक शिवप्रेमी भगवान शिवाची भक्ती, पूजा करतात. तसेच सोमवारी उपवास पकडतात. दरवर्षी श्रावण महिना हा ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये येत असतो. पण या वर्षी श्रावण जुलै महिन्यातच सुरु होत आहे.

हिंदू धर्मात प्रत्येक महिना हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केला जातो. पूर्वीपासून श्रावण महिना (Shravan) हा शिवभक्तीचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक शिवप्रेमी भगवान शिवाची भक्ती, पूजा करतात. तसेच सोमवारी उपवास पकडतात. दरवर्षी श्रावण महिना हा ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये येत असतो. पण या वर्षी श्रावण जुलै महिन्यातच सुरु होत आहे.

या महिन्यात उपवास केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात व भक्तांची मोनोकामना, इच्छा पूर्ण करतात असे मानले जाते. शास्त्रानुसार श्रावण या महिन्याला सर्वात पवित्र महिना म्हणून ओळखले जाते. यंदा अधिकमास असल्यामुळे, या वर्षी श्रावण (२०२३) हा ४ जुलै पासून चालू होणार असून तो ३१ ऑगस्टला संपणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिना हा ५ महिना आहे. या श्रावण महिन्यात सोमवारचे फार महत्व असते. या महिन्यातील सोमवारी अनेक लोक उपवास करतात.

श्रावणातील आठ सोमवार:

श्रावणाचातला पहिला सोमवार: १० जुलै
श्रावणाचातला दुसरा सोमवार: १७ जुलै
श्रावणाचातला तिसरा सोमवार: २४ जुलै
श्रावणाचातला चौथा सोमवार: ३१ जुलै
श्रावणाचातला पाचवा सोमवार: ७ ऑगस्ट
श्रावणाचातला सहावा सोमवार: १४ ऑगस्ट
श्रावणाचातला सातवा सोमवार: २१ ऑगस्ट
श्रावणाचातला आठवा सोमवार: २८ ऑगस्ट

श्रावण महिना का साजरा करतात?:

श्रद्धेनुसार असे मानण्यात येते की, प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरी जातात आणि त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळत असे. त्यामुळे याच वेळी शिवशंकर पृथ्वीवर येतात असाही अनेकांचा समज आहे आणि म्हणूनच शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो आणि हा सर्वाधिक पवित्र महिना समजण्यात येतो. तसेच देवी पार्वती यांनी या महिन्यात युवावस्थेत असताना केवळ शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर उपवास केला होता आणि त्यांच्या या कठोर तपस्येला याच महिन्यात शंकर भगवान यांनी फळ दिले होते . या महिन्यात करण्यात आलेल्या तपस्येचे चांगले फळ मिळते असा समज असल्याने श्रावण महिना साजरा करण्यात येतो व या महिन्यात अनेक उअपवासही केले जातात.

अनेक अविवाहित महिलादेखील मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून सोमवार चा उपवास करत असतात. श्रावण अधिमासमुळे यावर्षी विविध सणांच्या तारखांमध्ये बदल होणार आहे.नेहमी आषाढ पौर्णिमेच्या एक महिन्यानंतर रक्षाबंधन येते.परंतु श्रावण अधिकमासामुळे यावर्षी रक्षाबंधन २ महिन्यांनंतर म्हणजेच ३० ऑगस्टला असणार आहे.

हे ही वाचा:

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत मिळणार

मुंबई, ठाणे ,पालघरसह वसईमध्ये देखील पावसाने लावली हजेरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss