spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बिपरजॉय चक्रीवादळाचा लांबपल्याच्या गाड्यांवर मोठा परिणाम, पश्चिमी रेल्वेकडून नवीन अपडेट जारी

श्चिम रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे की, बिपरजॉय चक्रीवादळामुळे आतापर्यंत ९९ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

भारतावर बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biporjoy) मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे देशातील अनेक भागांमध्ये तीव्र वारे वाहू लागले. तसेच अनेक भागात मॉन्सूनपूर्वीच मुसळधार पाऊस ही झाला. बिपरजॉय हे चक्रीवादळ गुरुवारी रात्री गुजरात किनारपट्टीवर धडकले. यामुळे येथील अनेक भागात प्रचंड संपत्तीचे नुकसान झाले आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर सुद्धा झाला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

बिपरजॉयमुळे झालेला परिणाम पाहता पश्चिम रेल्वेने १८ जूनपर्यंत ९९ गाड्या रद्द केल्या आहेत. गुजरात आणि राजस्थानमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. म्हणूनच बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस आणखी काही गाड्या रद्द करण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने गुरुवारी केली होती. पश्चिम रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून एकूण ९९ गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय तीन गाड्या अपेक्षित स्थळी पोहोचण्यापूर्वी थांबवण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे की, बिपरजॉय चक्रीवादळामुळे आतापर्यंत ९९ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ३९ गाड्या त्यांच्या गंतव्य स्थानकापूर्वी थांबवण्यात येतील. बिपरजॉयमुळे गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. दुसरीकडे, कच्छ जिल्ह्यात चक्रीवादळामुळे जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली, अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आणि समुद्रालगतच्या सखल भागात पूर आला.

हे ही वाचा:

साखर कारखान्यासाठी असलेली २५ किलोमीटरची अट समितीद्वारे होणार शिथील, मुख्यमंत्री

Shravan 2023, यंदा श्रावण महिना वाढणार… जाणून घ्या सविस्तर

Shravan 2023, यंदा श्रावण महिना वाढणार… जाणून घ्या सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss