spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अयोध्या पोळ मारहाण प्रकरणी पोलिसांकडून आली महत्वाची माहिती समोर

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी या घडतच आहेत. रोजी कुठे ना कुठे वाद विवाद हे होतच हातात असतात. अशातच आता ठाण्यात पुन्हा एकदा वाद हा झाला आहे. कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय भीम नगर या ठिकाणी, दिनांक १६ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी या घडतच आहेत. रोजी कुठे ना कुठे वाद विवाद हे होतच हातात असतात. अशातच आता ठाण्यात पुन्हा एकदा वाद हा झाला आहे. कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय भीम नगर या ठिकाणी, दिनांक १६ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना महिला आघाडी अध्यक्षा कळवा विभाग यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त ‘विनम्र अभिवादन’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला अयोध्या पोळ यांना अतिथी म्हणून बोलावण्याचा बहाणा करून मारहाण करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक देखील करण्यात आली होती. हा वाद हळू हळू चांगलाच चिघळत देखील केला .

नुकतीच पोलिसांकडून या संदर्भात एक महत्वाची अपडेट ही समोर आली आहे. या मारहाण प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. तसेच कळवा पोलीस ठाण्यातच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आयोध्या पोळ यांच्या चेहऱ्याला शाई लावणाऱ्या महिला, तसेच त्यांना धक्काबुक्की करणाऱ्या महिलांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३००/२०२३ भादवि कलम १४२, १४५, १४७, १४९, ३४१, ३२३, ३२४, १२० ब अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

या सदरच्या गुन्ह्यात २ महिलांना अटक करण्यात आली आहे. कळवा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. संबंधित परिसरात परिस्थिती शांत आहे. तसेच परिसरातील राजकीय आणि सामाजिक हालचालींवर लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा:

अनुराग ठाकुर यांच्या भेटीदरम्यान कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीच काय?

International Yoga Day निम्मित भाजपचा मेगा प्लॅन, पंतप्रधानसह अनेक नेते होणार सहभागी

‘Kon Honar crorepati’ मध्ये विशेष भागात दिसणार तीन यार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss