spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तारीख ठरली! लवकरच होणार मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे सरकारचा इशारा…

त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे.

शिवसेनेचे सरकार जाऊन आणि शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना आता उलटून गेला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत तर, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे उपुख्यमंत्री आहेत. पण, राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती, मंत्रिमंडळ विस्ताराची. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार म्हणत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केल्या जात आहेत. तर विरोधकांच्या याच टिकांना उत्तर देत शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या मुहूर्ताबाबत एक मोठे वक्तव्य केले होते आणि त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे.

येत्या शुक्रवारपर्यंत म्हणजे ५ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती आता समोर येत आहे. तर राजभवनात सायंकाळी नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नव्या नेत्यांचा शपथविधी पार पडणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ६ तारखेला दिल्लीला जाणार असल्यामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयोजित केलेल्या निती आयोगाच्या बैठकीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ७ तारखेला दिल्लीत जाणार असल्यामुळे ५ तारखेला हा मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता या मंत्रिमंडळात नक्की कोणाला कोणते पदा मिळते आणि शिंदे – फडणवीस सरकार मंत्रिमंडळ विस्तारासाठी नक्की कोणता फॉर्म्युला वापरते, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Latest Posts

Don't Miss