spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिबिराच्या माध्यमातून उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले आणि त्यानंतर त्यांनी धनुष्यबाण आणि नावासाठी देखील दावा केला होता तो सुद्धा निर्णय हा शिंदे गटाच्या बाजूने लागला.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले आणि त्यानंतर त्यांनी धनुष्यबाण आणि नावासाठी देखील दावा केला होता तो सुद्धा निर्णय हा शिंदे गटाच्या बाजूने लागला. त्यामुळे शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले. शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे यावर्षी आपण दोन वार्डझापांदीनं साजरे करणार आहोत. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट कडून आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गटाकडून वर्धापनाचे आयोजन हे करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जातो याच शिवसेनेचा येत्या १९ जूनला वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाची तयारी ठाकरे गटाकडून आधीच करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटाने आज शिबिराचं आयोजन केलं आहे. वरळीतील NSCI इथं हे मोठं शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात नव्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत. तसंच, उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांची पक्षप्रमुखपदी फेरनिवड केली जाईल. याशिवाय आदित्य ठाकरे आणि अन्य नेत्यांची नेतेपदी निवड करण्यात येणार आहे. अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या टप्प्याटप्प्याने केल्या जातील. दरम्यान मुंबईत येताच आदित्य ठाकरेंनी शिबीराच्या तयारीची पाहणी केली. मेळाव्याला जवळपास सहा हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबिराच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या गोटात सध्या प्रचंड हालचाली सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर आणि तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी हे पाऊल उचललं जाणार आहे. शिवसेना फुटीनंतर आणि ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत २३ जानेवारी २०२३ रोजी संपल्यानंतर प्रथमच ही बैठक होणार आहे.कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवश्यक ठराव आणि कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानंतर ठाकरे गटातील बैठकांचे सत्र सुरुच आहे. १८ जूनला मुंबईत राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रमुख म्हणून फेरनिवड होणार आहे. कायदेतज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना राष्ट्रीय, राज्य कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी तालुका पातळीपासूनच्या सुमारे तीन-साडेतीन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा केंद्रात ही बैठक होणार आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन १९ जूनला होणार असून ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभाही होणार आहे.

हे ही वाचा:

कर्जत दिशेने जाणाऱ्या लोकलचे ५ डबे घसरले

संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss