spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

झणझणीत Rajasthani लसूण चटणी बनवा आणि नेहमीच्या जेवणाची चव आणखीन वाढवा…

सर्वप्रथम, लसूण सोलून घ्यावा. एका खलबत्यात कोथिंबीर, ओवा, बडीशेप, ४-५ लाल मिरच्या, लसणाच्या पाकळ्या घालून कुटून घ्याव्या.

कोणत्याही प्रकारची चटणी ही नेहमीच्या जेवणाला अतिशय उत्तम बनवते. रोजच्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी आपण आपल्या ताटात चटणीचा समावेश करतो. अनेक लोक जेवणासोबत कोणत्याही प्रकारची चटणी हमखास खातात. आपल्याकडे प्रामुख्याने नारळाच्या चटणीला विशेष पसंती असते. याशिवाय पुदिण्याची तसेच शेंगदाण्याची चटणी सुद्धा आवडीने खाल्ली जाते. परंतु तुम्ही कधी लसणाची चटणी कधी खाल्ली आहे का?

लसूण फक्त पदार्थाची चव वाढवत नाही तर, आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. लसणात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. लसणाची चटणी अनेक प्रकारे केली जाते. आज आपण राजस्थानी पद्धतीची लसूण चटणी कशी बनवायची हे पाहूयात. ही चटणी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते. यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. चला तर मग लसणाची चटणी कशी तयार करावी ते पाहुयात.

लसणाच्या चटणीसाठी लागणारे साहित्य –

  • लसणाच्या पाकळ्या
  • टोमॅटो
  • आल्याचा तुकडा
  • लाल सुक्या मिरच्या – ३ ते ४
  • कोथिंबीर
  • ओवा – १ टीस्पून
  • बडीशेप – १ टीस्पून
  • जिरे – १ टीस्पून
  • हिंग
  • देसी तूप – २ चमचे
  • मीठ – चवीनुसार

लसणाची चटणी बनवण्यासाठी पुढील कृती करावी –

सर्वप्रथम, लसूण सोलून घ्यावा. एका खलबत्यात कोथिंबीर, ओवा, बडीशेप, ४-५ लाल मिरच्या, लसणाच्या पाकळ्या घालून कुटून घ्याव्या. जर हवं असल्यास आपण त्यात पाणी देखील ऍड करू शकता. आता मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोचे तुकडे, उरलेल्या लाल मिरच्या घालून बारीक पेस्ट तयार करावी. आता एका भांड्यात देशी तूप घालून गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात जिरे, हिंग घालून थोडं परतून घ्या. यानंतर कढईत ठेचलेला लसणाचा मसाला, व चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. यानंतर त्यात टोमॅटो आणि मिरचीची पेस्ट घालून मिक्स करा. पेस्ट अधूनमधून चमच्याने ढवळत राहा. यानंतर गॅस बंद करा. व ही चटणी एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. अशा प्रकारे राजस्थानी स्टाईल लसणाची चटकदार चटणी खाण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा:

Karan Deol आणि Drisha Acharaya अडकले लग्नबंधनात!

राज ठाकरे यांचे जातीय व्यवस्थेवर परखड मत!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss