spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ashadhi Ekadashi 2023, पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांचं वेळापत्रक जाहीर

आषाढी एकादशीचा सोहळा राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भक्त पंढरपूर गाठतात. पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन करण्यासाठी अनेक भाविक आतुरलेले असतात.

आषाढी एकादशीचा सोहळा राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भक्त पंढरपूर गाठतात. पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन करण्यासाठी अनेक भाविक आतुरलेले असतात. आषाढी एकादशी निम्मित लाखो वारकरी भक्त विठू नामाचा गजर करत पंढरपूरला पायी चालत जातात. यालाच आषाढी वारी असे म्हणतात. मात्र अनेकांना वयोमानानुसार पंढरपूरला विठू माउलीचे दर्शन घेण्यासाठी पायी जाता येत नाही. अशातच अनेक भक्त पंढरपूरला जाण्यास रेल्वेचा वापर करतात. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. म्हणूनच पंढरपूर येथे विठोबाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून २४ जून पासून मध्य रेल्वेने ७६ विशेष गाड्यांची सोय केली आहे. त्याचबरोबर दक्षिण मध्य रेल्वेकडून सहा विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. यातील १८ गाड्या मनमाडमार्गे पंढरपूर गाठणार आहेत.

नागपूरहून जाणाऱ्या भाविकांसाठी

नागपूरहून जाणाऱ्या भक्तांसाठी नागपूर-मिरज गाडी २५ व २६ जूनला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी नागपूर वरून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा वाजून ५५ मिनिटांनी मिरजला पोहोचेल. त्याचबरोबर २६ व २९ जून रोजी पहाटे बारा वाजून ५५ मिनिटांनी मिरजहून सुटणार असून दुसऱ्या दिवशी बारा वाजून २५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. ही विशेष रेलवे २० डब्यांची असेल व ही विशेष गाडी अजनी, वर्धा, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, दौंड, पंढरपूर या सर्व स्थानकांवर थांबेल. त्याचबरोबर नागपूर- पंढरपूर ही रेल्वे २६ आणि २९ जूनला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी नागपूर स्थानकावरून सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पंढरपूरला पोहोचेल. तसेच २७ व ३० जूनला पंढरपूर वरून संध्याकाळी पाच वाजता सुटून दुसऱ्या दिवशी बारा वाजून २५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल.

अमरावती, लातूर, मिरजहून जाणाऱ्या भाविकांसाठी

नवीन अमरावती- पंढरपूर ही गाडी २५ आई २८ जूनला दुपारी दोन वाजून ४० मिनिटांनी नवीन अमरावती वरून सुटणार आहे. व दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल. तसेच पंढरपूरहुन २६ व २९ जूनला संध्याकाळी सात वाजून ३० मिनिटांनी सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजून ४० मिनिटांनी नवीन अमरावतीला पोहोचेल. पंढरपूर गाडी २६ आणि २९ जूनला सकाळी साडेअकरा वाजता खामगाव येथून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी साडेतीन वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. त्याचबरोबर पंढरपूर या ठिकाणावरून २७ व ३० जूनला पहाटे पाच वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजता खामगावला पोहोचणार आहे. तसेच लातूर पंढरपूर साठी आठ विशेष गाड्या मिरज पंढरपूरसाठी ३० गाड्या व मिरज कुर्डुवाडीसाठी वीस विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्या

दक्षिण मध्य रेल्वेकडून देखील सहा विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. यामध्ये जालना- पंढरपूर गाडी २७ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता जालन्यावरून सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता पंढरपूर येथे पोहचणार आहे. पंढरपूर- नांदेड गाडी पंढरपुरवरून २८ जून रोजी सकाळच्या वेळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजेपर्यंत नांदेडला पोहोचेल. छत्रपती संभाजीनगर- पंढरपूर या ठिकाणावरून २८ जूनला रात्री नऊ वाजून ४० मिनिटांनी छत्रपती संभाजीनगरहुन सुटेल व दुसऱ्या दिवशी साडेअकरा वाजता पंढरपूरला पोहचेल. त्याचबरोबर २९ जून रोजी पंढरपूर वरून रात्री साडेअकरा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजी नगरला एक वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. आदिलाबाद- पंढरपूर ही गाडी आदिलाबाद वरून २८ जूनला सकाळी ११ वाजता सुटून पंढरपूरला दुसऱ्या दिवशी नऊ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. पंढरपूरहुन 29 जूनला रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल तर आदिलाबादला दुसऱ्या दिवशी आठ वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल.

भुसावळ पंढरपूर विशेष गाडी

भुसावळ पंढरपूर विशेष गाडी २८ जून रोजी भुसावळवरून दुपारच्या वेळी दीड वाजता सुटणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता पंढरपूरला पोहोचेल. तसेच पंढरपूर वरून रात्री साडेदहा वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता भुसावळ या ठिकाणी पोहोचेल. या सर्वात मोठ्या 24 डब्यांच्या गाडीसाठी जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी या स्थानकांवर थांबतील.

हे ही वाचा:

Karan Deol आणि Drisha Acharaya अडकले लग्नबंधनात!

संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss