spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिना निमीत्त शिंदेगटाकडून शक्तिप्रदर्शन… तर सामनातून शिंदेंवर हल्लाबोल!

सामनाच्या अग्रलेखात नकली शिवसेना काळाच्या ओघात नष्ट होईल असे सुद्धा छापून आले आहे. 'शिवसेना ५७ वर्षांची झाली हा एक चमत्कार म्हणावा लागेल.

आज १९ जून रोजी शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिन आहे. या निमित्त शिंदे आणि ठाकरे गटांकडून मोठे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापन दिन साजरे करण्यात येणार आहेत. शिंदे गटाने वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये भव्य मेळावा आयोजित केला आहे, तर ठाकरे गटाचा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. दोन्ही कार्यक्रमांसाठी राज्यभरातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सेनेच्या वर्धापनदिनी सामनातील अग्रलेखात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रखर टीका करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ‘महाराष्ट्रातील मिंध्या कोल्ह्या-लांडग्यांचे केकाटणे वाघाच्या डरकाळीत विरून जाणार, अशा शब्दांत सामनातून टीका करण्यात आली आहे.तसेच ‘शिवसेना ही मर्द मावळ्यांची भगवद्गीता आहे. आज बाळासाहेब शरीराने आपल्यात नाहीत. पण त्यांचा अंगारी विचार हाच आपला अग्निपथ आहे. खरी शिवसेना तीच, जिच्या पोटात एक ओठात दुसरे नाही. इथे सकाळी निष्ठेच्या आणाभाका घ्यायच्या व रात्रीच्या अंधारात सुरतचा ढोकळा खायला पळून जायचे हे दळभद्री उद्योग शिवसेनेच्या रक्तात नाहीत. शिवसेना ५७ वर्षांची झाली व तिची घोडदौड यापुढेही सुरूच राहील ती याच प्रामाणिकपणामुळे. मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या’! असे सुद्धा सामन्यात छापून आले आहे.

सामनाच्या अग्रलेखात नकली शिवसेना काळाच्या ओघात नष्ट होईल असे सुद्धा छापून आले आहे. ‘शिवसेना ५७ वर्षांची झाली हा एक चमत्कार म्हणावा लागेल. स्थापनेपासून शिवसेना संकटाचा आणि फाटाफुटीचा सामना करीत आहे; पण कोणी कितीही बेइमानी केली तरी ‘सामना’ शिवसेनाच जिंकत आली व सर्व महाराष्ट्रद्रोही कचरा उडावा तसे उडून गेले. हा आजचा वर्धापन दिन खासच म्हणावा लागेल. वर्षभरापूर्वी याच काळी शिवसेनेतील ४० बेइमानांनी आईच्या दुधाशी गद्दारी केली. ते भाजपास सामील झाले आणि ‘आम्हीच खरी शिवसेना’ असे मिरवू लागले. अर्थात शिवसेनेच्या स्थापनेपासून असे प्रतिशिवसेना स्थापणारे आले आणि काळाच्या ओघात नष्ट झाले’.

हे ही वाचा:

राशिभविष्य,१९ जून २०२३,आज तुम्ही बरेच मजबूत असाल…

झणझणीत Rajasthani लसूण चटणी बनवा आणि नेहमीच्या जेवणाची चव आणखीन वाढवा…

घरचा घरी बनवा कोथिंबीर पंजिरी; वाचा संपूर्ण रेसिपी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss