spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

UP आणि Bihar मध्ये १०० हुन अधिक जणांचा मृत्यू, तर ४०० हुन अधिक जणांवर उपचार

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मागील तीन दिवसांपासून १०० हुन अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताने झाले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मागील तीन दिवसांपासून १०० हुन अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताने झाले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु काही आरोप करत आहे यामागे दूषित पाणी हे देखील कारण असू शकते असे उत्तर प्रदेशच्या एका वरिष्ठ सरकारी डॉक्टरांचे मत आहे. पाणी दूषित असल्यामुळे आता बलियामधील पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशमधील फक्त बालिया जिल्यामध्ये ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४०० हुन अधिक लोकांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

बिहारमध्ये मागील २४ तासांमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. उष्णतेच्या लाट आणि उष्माघातामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्माघातामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या १०० च्या पुढे गेली आहे. सध्या उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांबरोबर पूर्ण उत्तर भारतामध्ये उष्णतेचा पारा वाढला आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अनेक जिल्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान दिले आहे. एवढेच नाही तर हवामान विभागाने २४ तासांमध्ये बिहारच्या बांका, जमुई, जहानाबाद, खगडिया, लखीसराय, नालंदा, नवादा, पटना, समस्तीपूर, शेखपुरामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

वाढती उष्णता आणि उष्माघात यामुळे रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढत आहे . आरामध्ये उष्णतेमुळे आतापर्यत १० ते १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. पटनातील शाळा २४ जून पर्यंत बंद राहणार आहे. शाळा १९ जून रोजी सुरू होणार होत्या. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा:

अनुराग ठाकुर यांच्या भेटीदरम्यान कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीच काय?

International Yoga Day निम्मित भाजपचा मेगा प्लॅन, पंतप्रधानसह अनेक नेते होणार सहभागी

‘Kon Honar crorepati’ मध्ये विशेष भागात दिसणार तीन यार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss