spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Squid Game 2 चा टिझर सोशलमिडीयावर तुफान व्हायरल… ‘या’ दिवशी सुरू होणार मृत्यूचा खेळ!

'स्क्विड गेम २' मध्ये काही जुन्या कलाकारांसोबत नवीन चेहरेदेखील झळकणार आहेत. यात कोरियन अभिनेता आणि गायक यिम सी-वान (Yim Si-wan), कांग हा-नेउल (Kang Ha-neul), पार्क सुंग-हून (Sung-hoon) आणि यांग डोंग-जौन (Yang Dong-Joun) चा समावेश आहे.

‘स्क्विड गेम’ (Squid Game ) ही २०२१ मध्ये प्रदर्शित झालेली जगप्रसिद्ध कोरियन सीरिज आहे. या सिरीजवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले. स्क्विड गेम ही २०२१ मधील सर्वात लोकप्रिय सिरीजपैकी एक होती. या सिरीजच्या शेवटी असे सांगण्यात आले होते की, पुढील सीझन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. परंतु, कधी आणि केव्हा ते निर्मात्यांकडून नव्हते सांगण्यात आले. चाहत्यांमध्ये स्क्विड गेम ची लोकप्रियता प्रचंड वाढली तसेच याच्या दुसऱ्या सीजनची सर्वांनाच मोठी उत्सुकता लागली. म्हणूनच प्रचंड लोकप्रियता पाहता निर्मात्यांना सिरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा आहे, असे जाहीर केले आहे. व स्क्विड गेम २ चा टिझर सुद्धा रिलीज केला आहे. या मुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘स्क्विड गेम २’ चा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सीरिजचा टीझर शेअर करत निर्मात्यांनी रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे. या नव्या सीझनमध्ये काही नवीन कलाकारदेखील झळकणार आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘स्क्विड गेम २’ प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने ‘स्क्विड गेम २’ या वेबसीरिजचा टीझर शेअर करत लिहिलं आहे,रेड लाईट…ग्रीन लाईट! ‘स्क्विड गेम २’ अधिकृतरित्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. ह्वांग डोंग-ह्युक (Hwang Dong-hyuk) हे ‘स्क्विड गेम२’ चे दिग्दर्शन करणार आहेत. ‘स्क्विड गेम २’ ही सीरीज २०२४ मध्ये रिलीज होणार आहे.

‘स्क्विड गेम २’ मध्ये काही जुन्या कलाकारांसोबत नवीन चेहरेदेखील झळकणार आहेत. यात कोरियन अभिनेता आणि गायक यिम सी-वान (Yim Si-wan), कांग हा-नेउल (Kang Ha-neul), पार्क सुंग-हून (Sung-hoon) आणि यांग डोंग-जौन (Yang Dong-Joun) चा समावेश आहे. हे कलाकार या सीरिजमध्ये कोणत्या भूमिकेत झळकणार याची आता चाहत्यांना उत्सुकता आहे.’स्क्विड गेम’ च्या पहिल्या सिजनमध्ये होयोन जंग (HoYeon Jung), गोंग यू (Gong Yoo), ली जंग-जे (Lee Jung-jae) आणि ली यू-मी (Lee Yoo-mi) हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

हे ही वाचा:

UP आणि Bihar मध्ये १०० हुन अधिक जणांचा मृत्यू, तर ४०० हुन अधिक जणांवर उपचार

UP आणि Bihar मध्ये १०० हुन अधिक जणांचा मृत्यू, तर ४०० हुन अधिक जणांवर उपचार

काठमांडूमध्ये Adipurush चित्रपटावर बंदी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss