spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे फडणवीस सरकारची २५ जूनला जालना येथे सभा

शिंदे फडणवीस सरकार स्थान झाल्यानंतर कामांना आणि अनेक प्रकल्प हे जोरात सुरु झाले. त्याचबरोबर बंद पडलेली कामे ही पुन्हा नव्याने सुरु झाली.

शिंदे फडणवीस सरकार स्थान झाल्यानंतर कामांना आणि अनेक प्रकल्प हे जोरात सुरु झाले. त्याचबरोबर बंद पडलेली कामे ही पुन्हा नव्याने सुरु झाली. शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून अनेक उपक्रम हे राबवले जात आहे. त्यापैकी शासन आपल्या दारी हा उपक्रम सालग्यांचं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चालू झाला आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने राज्यभरात “शासन आपल्या दारी” अभियान राबवले जात आहे. विशेष म्हणजे या अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात सभा देखील घेतल्या जात आहे. दरम्यान शासन आपल्या दारी अभियानातंर्गत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात (Jalna District) देखील सभा आयोजित करण्यात आली आहे. २५ जून रोजी ही सभा होणार आहे. त्यामुळे यासाठी प्रशासनाकडून बैठकांचं नियोजन करण्यात येत आहे.

“शासन आपल्या दारी”अभियानातंर्गत प्राप्त लाभार्थ्यांना थेट विविध शासकीय योजनांचा लाभ, महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सध्या राज्यभर असे अभियानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून जालना शहरातील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पांजरपोळ मैदान येथे २५ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या वतीने नियोजित भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या संदर्भात शासन आपल्या दारी अंतर्गत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जालन्यात नियोजित कार्यक्रमाबाबत पूर्वतयारी बैठक पार पडली. तर याच नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत सोमवारी केंद्रीय रेल्वे, कोळसाव खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली.

दरम्यान या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दानवे यांनी बैठकीत विविध सूचना केल्या. कार्यक्रमस्थळी उपस्थित लाभार्थी, नागरिक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षताघ्यावी. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावावेत. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन द्यावी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करावा, अशा सूचना दानवेंनी यावेळी दिल्या. तसेच सभेला उपस्थित असणाऱ्या जनतेची देखील सोय व्यवस्थित व्हावी यासाठी तयारी करावी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला नाही पाहिजे असे सांगण्यात आपले आहे.

हे ही वाचा:

अशोक खरातांकडून संदीप देशपांडेवर जोरदार हल्ला..

गद्दार दिन यावर शिंदे गटाच्या बड्या नेत्यांनी दिली प्रतिक्रिया, हळू हळू बंडाचे खरे स्वरुप…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss