spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

All India Cine Workers Association ने केली नरेंद्र मोदींकडे मागणी

बहुचर्चित आदिपुरुष हा चित्रपट ओम राऊत आणि दिग्दर्शित केला आहे. आदिपुरुष या चित्रपटावर अनेकांनी टीकांचा वर्षाव केला आणि त्यामुळे आता सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले आहे.

बहुचर्चित आदिपुरुष हा चित्रपट ओम राऊत आणि दिग्दर्शित केला आहे. आदिपुरुष या चित्रपटावर अनेकांनी टीकांचा वर्षाव केला आणि त्यामुळे आता सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांमध्ये नाराजी आहे. चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. आदिपुरुष हा चित्रपट कोणत्याच पातळीवरून प्रेक्षकांना पसंत पडलेला नाही हे दिसून आलेले आहे. आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोशिएननं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे.

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन केलेल्या निवेदनामध्ये लिहिले आहे की, आदिपुरुष या चित्रपटाचे शो तातडीने थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे. आदिपुरुष चित्रपटामध्ये जे काही मांडण्यात आले आहे ते सर्व आमच्या मनामधील रामायण नाही. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना दाखवून आणखी वाद निर्माण करण्यात येऊ नये. चित्रपट बंद करण्यात यावा अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे. १६ जून आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. जेव्हापासून चित्रपट सातत्याने सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय झाला आहे.

चित्रपटामधील कथा, भूमिका करणारे कलाकार, दिग्दर्शन, संवाद या साऱ्या गोष्टी वादाचे कारण ठरताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी त्याबाबतीत तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर चित्रपटामधील प्रभू राम, हनुमान, रावण आणि व्हीएफेक्स याची खिल्ली सोशल मीडियावर उडवण्यात आली आहे. तुम्ही लोकांना काय सांगत आहात या प्रकारच्या चित्रपटामधून नव्या पिढीसमोर काय संदेश जाणार आहे याचा विचार करणार आहेत की नाही असे प्रश्न या मेकर्सने उपस्थित केले आहेत. त्यामध्ये आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोशिएशनच्या वतीनं मोदींकडे तक्रार करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

Ashadhi Wari 2023, मुक्ताबाईंच्या पालखीचा विसावा वाकवड येथे तर धंदेवाडीत नाथांच्या पालखीचे उभे रिंगण

Mumbai Police यांच्याकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, खोके दिन, गद्दार दिन साजरा…

Ashadhi Ekadashi 2023, आजपासून निघणार आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss