spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बच्चू कडू शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले…

राज्यात सत्तांतर घडवून आणल्यानंतर गेल्या वर्षभरात घडामोडी पाहिल्यात तर राजकारणात निवडणूक अजूनही घेतल्या जात नाही.

राज्यात सत्तांतर घडवून आणल्यानंतर गेल्या वर्षभरात घडामोडी पाहिल्यात तर राजकारणात निवडणूक अजूनही घेतल्या जात नाही. काही निर्णय खरंच चांगले घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिव्यांग मंत्रालय दिलं. याचा मला आनंद आहेच. पण सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय फार महत्त्वाचे आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त भरपाई दिली आहेत. तसेच आताही १५०० कोटींची भरपाई दिली. एकंदरीत आपण सात ते आठ हजार कोटींवर चाललोय”, असं बच्चू कडू म्हणाले. आणि प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

बच्चू कडू यांना आज मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सध्याच्या घडीला मंत्रिमंडळ विस्तार करण्याची क्षमताच नाही, असं मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच भाजपसोबत गेलेल्या सर्व ५० आमदारांना फक्त विरोधकांकडून त्रास दिला जातोय, असं नाही. तर भाजपकडूनही काही जणांकडून त्रास दिला जात असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. विरोधकांकडून 50 खोक्यांचा आरोप करुन टीका केली जातेय. तशीच टीका मित्र पक्षाच्या काही जणांकडूनही करण्यात आली, असं बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम नुकसान भरपाई म्हणून या सरकराने दिलेली आहे. कधीही आणि कुणालाही उपलब्ध होईल असा मुख्यमंत्री राज्याला मिळाला आहे. कदाचित हा उठाव झाला नसता तर मुख्यमंत्री इतक्या स्थानिक पातळीवर येऊन काम करु शकतो हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसलं नसतं. ही मोठी उपलब्धी आहे”, असा दावा बच्चू कडू यांनी केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्र्रची जनता आणि त्यांना मानणाऱ्या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

हे ही वाचा:

शिंदे फडणवीस सरकारची २५ जूनला जालना येथे सभा

शिवसेनाभवनातून उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss