सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची सुपरहिट मेजवानी ही सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना देखील नवं नवीन कार्यक्रम हे पाहायला मिळत आहेत अश्यातच आता आणखी एका नव्या कार्यक्रमाची भर ही पडली आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम दिनांक ४ जून पासून आपल्या सर्वांच्या भेटीस आला आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाने पहिल्या भागापासूनच चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तेव्हा पासूनच या कार्यक्रमाला चाहत्यांची पसंती मिळाली. खुपते तिथे गुप्ते हा मराठी वाहिनीवरील प्रचंड जुना कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावत असतात. आता पुढील भागात कोण उपस्थिती लावणार अशी उत्सुकता ही सर्वाना लागली आहे. अश्यातच नुकताच सोशल मीडियावर या संदर्भातला एक प्रोमो हा शेअर करण्यात आला आहे.
‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाच्या यंदाच्या सीजनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे, आणि नारायण राणे यांनी उपस्थिती लावली होती परंतु आता आता ४ भागात कोण हजेरी लावणार असा प्रश्न पडलेला असतानाच ‘खुपते तिथे गुप्ते’ चा पुढील भागाचा छोटासा प्रोमो हा शेअर करण्यात आला आहे. तर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहेत. नुकताच खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, संजय राऊत हे नारायण राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
मागील भागांमध्ये नारायण राणे यांनी उपस्थिती लावली होती त्यावेळी नारायण राणे यांनी संजय राऊतांवर चांगलाच हल्लाबोल हा केला होता. राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप करणारे नेते हे ‘खुपते तिथे गुप्ते’ च्या मंचावर देखील एका मागोमाग एक आले आहेत. आता संजय राऊत यांना नारायण राणे यांचा एक व्हिडिओ हा दाखवण्यात आला आहे. नारायण राणेंच्या प्रतिक्रियेनंतर आता अजय राऊतांनी देखील चांगलाच हल्लाबोल हा केला आहे.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नारायण राणे म्हणतात, “भारतामध्ये इलेक्शन रोलमध्ये नाव नसेल तर लोकप्रतिनिधी होता येत नाही. साहेब मला म्हणाले, नारायण याला खासदार करायचंय आपल्याला, मी फक्त साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण केला.” नारायण राणे यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर संजय राऊत म्हणाले, “हे खोटं बोलत आहेत. मतदार नोंदणी क्रमांक मी दिलेला आहे. या वक्तव्यामुळे त्यांची खासदारकी जाऊ शकते.” संजय राऊत हे खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या मंचावर आणखी कोणत्या विषयांवर चर्चा करणार? याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. आता संजय राऊत हे या कार्यक्रमात अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना कशी उत्तरं देतात? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. दिनांक २५ जून २०२३ रोजी रविवारी ९ वाजता ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा हा एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
हे ही वाचा:
Mumbai-Pune Express way वरील खंडाळा घाटामध्ये ऑईल टँकरला आग
वारकरी विठुरायाच्या पायी माथा टेकवण्यासाठी आतुर