spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यामधील घर पाण्याच्या टँकरवर अवलंबून

महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन तर झाले आहे. परंतु मान्सून अजून सक्रिय झालेला नाही त्यामुळे राज्यावर अनेक समस्या आणि परिणाम दिसत आहेत.

महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन तर झाले आहे. परंतु मान्सून अजून सक्रिय झालेला नाही त्यामुळे राज्यावर अनेक समस्या आणि परिणाम दिसत आहेत. राज्यामधील जनता उन्हाच्या उकाड्यामुळे हैराण झाली आहे. परंतु राज्यामध्ये अजूनही जोरदार पावसाला सुरुवात झालेली नाही. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी मान्सूनचे आगमन हे जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात होते परंतु अजून धुवाधार पावसाला सुरुवात झालेली नाही. राज्यामध्ये म्हणाव्या तशा पावसाच्या सरी कोसळत नाहीयेत. परिणामी राज्यमधिल नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

पुणे जिल्यामध्ये पाऊस लांबल्याचे परिणाम दिसून आले आहेत. सध्या लगेचच या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. पुणे जिल्यामधील धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. मान्सून अजून सक्रिय झालेला नसून पुण्यामध्ये दरवर्षी जूनच्या अखेरपर्यंत टँकरची मागणी कमी झालेली असते. परंतु यावर्षी उलट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू महिन्यामध्ये टँकरची मागणी वाढत आहे असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. पुण्यामधील तीन तालुक्यामधील ६७ गाव पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. आंबेगाव, जून्नर आणि खेड या तीन तालुक्यातील ६७ गावात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुण्यामध्ये या तीन तालुक्यामध्ये पाण्यासाठी टँकरच्या दिवसाला ३६ फेऱ्या होत आहेत. आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक १६, खेड १३ आणि जुन्नरमधील १० गावं वॉटर टँकरवर अवलंबून आहेत. मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे तालुक्यामधील विहिरी आणि धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढली आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मागीलवर्षी १६ जूनला ५९ गावातील खेडेगावांमध्ये ६६ टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. यंदा टँकरची संख्या ४४ आहे. परंतु पाण्याची मागणी करणाऱ्या गावाची संख्या ६७ यंदा पुण्यामध्ये मान्सूनच्या आगमनाला १० दिवसांचा विलंब झाला आहे. पुण्यामध्ये २२ जूनला पाऊस बरसेल अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा:

International Yoga Day निम्मित पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतून देशाला केले संबोधित, म्हणाले…

Weather Update, २३ जून नंतर राज्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता…

Khupte Tithe Gupte नव्या प्रोमोने वेधले लक्ष, ‘हा’ नेता देणार सडेतोड उत्तरं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss