spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लवकरच होणार अंधेरी रेल्वे स्थानकाचा कायापालट

सीएसएमटी (CSMT) रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासानंतर आता अंधेरी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा (Redevelopment)आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

अंधेरी हे मुंबई शहराच्या अंधेरी भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. वांद्रे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे सर्व जलद व धीम्या लोकलगाड्या थांबतात. पश्चिम रेल्वेमार्गावरील अंधेरी हे सर्वात गर्दीचे स्थानक आहे. लोकल गाड्यांखेरीज येथे काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात.मुंबईतील एक ऐतिहासिक रेल्वे स्थानक म्हणजेच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस, बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे.

 

सीएसएमटी (CSMT) रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासानंतर आता अंधेरी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा (Redevelopment)आराखडा तयार करण्यात आलेला आहे. रेल्वे स्थानक (railway station) आणि परिसरातील मोकळ्या जागेचा निवासी आणि व्यावसायिक वापर करण्याचा मार्ग खुला करण्यात आलेला आहे. अंतिम प्रस्तावावर रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा करण्यात आली आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरण (RLDA) आणि पश्चिम रेल्वेनं अंधेरी स्थानक पुनर्विकासासूचा (Redevelopment) आराखडा तयार केला आहे. मात्र अंतिम निर्णयासाठी रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा केली जात आहे. रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर विकास कामांना सुरुवात होईल. प्रवासी गर्दी सुलभपणे हाताळणे ,जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवणे आणि शहरातील केंद्रबिंदू म्हणून सुविधा उपलब्ध करून देणे या बाबींवर लक्ष केंद्रित करून हा पुनर्विकास ( Redevelopment)होणार आहे.पुनर्विकास ( Redevelopment) टप्याटप्याने करण्यात येईल.

अंधेरी स्टेशन हे पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दी असणारं ठिकाण आहे. अंधेरी स्थानकावर हार्बर लाईन देखील जोडली जाते, तसेच मेट्रो वन मार्गे केबल अंधेरी स्थानक देखील या रेल्वे मार्गाला जोडलं गेलं असल्याने दररोज पाच लाखांपर्यंत प्रवाशांची वाहतूक रेल्वे स्थानकातून होत असते. या पुनर्विकास आराखड्यानुसार मुक्त वावर क्षेत्र आणि तिकीट बंधनकारक असलेले क्षेत्र असे दोन भाग विकसित करण्याचे नियोजन आहे. हरित इमारतीवर दिव्यांग पूरक स्थानक, सीसीटीव्ही आणि आधुनिक इमारत व्यवस्थापन आणि स्मार्ट स्थानक,असे अनेक बदल अंधेरी रेल्वेस्टेशन पुनर्विकासात(Redevelopment)करण्याचे नियोजले आहे.

 

 ही वाचा:

जागतिक योग दिवस | International Day of Yoga |

Khupte Tithe Gupte च्या मंचावर Sanjay Raut यांनी दिली सडेतोड उत्तरं । Avadhoot Gupte । नारायण राणे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss