spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईतून काँग्रेस आक्रमक, पोलिसांकडून बड्या नेत्यांना अटक

मुंबई : वाढती महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ योजना, शेतक-यांचे प्रश्न, राज्यपालांनी केलेला महाराष्ट्राचा अवमान या विरोधात काँग्रेसचे राजभवनासामोर आंदोलन सुरु केले होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांच्या उपस्थितीत आज सकाळी आंदोलनाला सुरुवात झाली. कमला नेहरू पार्क हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत मोर्चा काढून राजभवनाचा घेराव आणि जेलभरो आंदोलन करण्यात आले. परंतु मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे आंदोलनकर्त्यांना पुढे जाऊन दिले नाही.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेते आंदोलनात सहभागी होत आहेत. आंदोलन कर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहता, पोलिसांनी सर्व नेत्यांना अटक केले. राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयी स्थानिक नेते आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आंदोलनात सह्भागी होते. त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : 

काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावले ते भाजपनं 7 वर्षात गमावले, राहुल गांधींची मोदींवर टीका

खाद्यातेलांच्या किमतींबाबत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Latest Posts

Don't Miss