spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मंत्रिमंडळाचा विस्तार करायला कशाला घाबरत आहात?, अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल

बारामती : राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे गेले अनेक दिवस महाराष्ट्रतील पूरग्रस्त भागात पाहणी दौरा करत आहे. पूरग्रसत्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी अजित पवार हे राज्य सरकारकडे मागणी करत आहे. या संदर्भात पवारांनी राज्यपालांची देखील भेट घेतली. आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी म्हटले, राज्यत मंत्रिमंडळाचा विस्तार न करण्याचे कारण अजूनही समजू शकले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी कशाला घाबरत आहेत? असा प्रश्न याठिकाणी अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

पुढे अजित पवार म्हणाले,” राज्यातील 13 कोटी जनता फार आशेने मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहत आहे. नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. त्या त्या खात्याचे मंत्रीच हे प्रश्न सोडवू शकतात. मंत्र्यांचा रिमार्क असल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही या परिस्थीची जाणिव मुख्यमंत्र्यांना करून दिली. पण ते लक्ष देत नाहीत. म्हणून राज्यपालांना भेटलो. आता जनतेनीच पाहावे कसा राज्यात कारभार चाललाय आणि कोण त्याला जबाबदार आहे, असे अजित पवार याने आपले मत स्पष्ट केले.

मी स्वतः जागेवर जाणून लोकांची विचारपूस केली अतिशय वाईट परिस्थिती आहे, असे अजित पवार यांनी म्हटले, पुढे म्हणाले, गोगलगायीचा प्रादूर्भाव, पिकं उद्ध्वस्त झाली, लोकं आत्महत्येचेअसे टोकाचे पाऊल उचलत आहेत. हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. त्यामुळे तातडीने या गोष्टीची दखल घ्यावी आणि त्यांना तातडीने मदत करावी. मनुष्यहानी झाली, पाळीव प्राण्यांची हानी, रस्ते खचले, शेती, घर सर्वांचं नुकसान झाले आहे. पूल तुटले आहेत. पंधरा तीन आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे लोकांना मदत दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

मुंबईतून काँग्रेस आक्रमक, पोलिसांकडून बड्या नेत्यांना अटक

Latest Posts

Don't Miss