spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ashadhi ekadashi, वर्षानुवर्षे विठ्ठलाच्या मंदिरात घडणारा ‘हा’ चमत्कार तुम्हाला माहित आहे का ?

प्रत्येकवर्षी मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचे आराध्यदैवत प्रभु विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा ही केली जाते.

पंढरपुरातील विठ्ठल मंदिर हे वारकऱ्यांचे मोठे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. पंढरपुरातील या विठ्ठलमंदिराला तब्ब्ल ८ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत. गेली अनेक वर्षे विठोबाच्या देवळात एक चमत्कार घडत आहे. पण त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण त्याबद्दल माहिती घेऊयात.

पंढरपुरातील विठ्ठलमंदिरात प्रभू विठ्ठलाच्या मूर्तीची रोज सकाळी पूजा केली जाते. नैवद्य दिले जातात. तसेच देवास गंध लावतात. विठ्ठलाच्या अंगावरील वस्त्रे नीट करून धूप, दीप व लोणी खडीसाखरेचा, लाडू- दुधाचा भोग दाखवितात. यानंतर गाईच्या तुपात भिजविलेल्या खादीच्या नव्या कापडाने मध्यंतरात विठ्ठलांच्या मुखी लोण्याचा गोळा व तुलसीपत्राबून केली जाते. विशेष म्हणजे लोण्याचा गोळा खाली पडत नाही. तर तो विठोबाच्या ओठांवरच राहतो. तो काढायचा म्हटलं तर पुजाऱ्यांना हातानेच काढून घ्यावा लागतो.परंतु विशेष गोष्ट अशी की, जर ते लोणी शिळे असेल तर ते मुर्तीच्या मुखाला राहत नाही. लगेचच खाली पडते. या नैवेद्यानंतर विठोबाला अभ्यंगस्नानानंतर श्रीवास संपूर्ण भरजरी पोशाख केला जातो. चंदनाचे लावून केशर कस्तुरी टिळा लागला जातो. नंतर धूप दीप लावला जातो.

प्रत्येकवर्षी मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचे आराध्यदैवत प्रभु विठ्ठल पांडुरंगाची आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा ही केली जाते. दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते. प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्रांप्रमाणे असतात. सव्वाचार वाजता काकड्याला सुरुवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते. विठोबा मंदिरात जमलेले शेकडो भाविक तन्मयतेने ‘उठा उठा विठूराया’ भूपाळी म्हणत असतात. विठूरायाजवळचे सेवेकरी पूजेच्या तयारीला लागलेले असतात. भगवंतांचे पादप्रक्षालन होते, आचमन दिले जाते. पुजारी देवाच्या अंगावरील हार-फुले काढून टाकून त्याजागी ताजे हार, पुष्पे व तुळशीपत्र पांडुरंगास अर्पण करतात.

Latest Posts

Don't Miss