spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोविड सेंटर कथित गैरव्यवहार प्रकरणातील Sanjeev Jaiswal आणि Suraj Chavan यांचा काय संबंध?

ईडीने (ED) बुधवारी कोविड सेंटरच्या गैरव्यवहारप्रकरणी ठाकरे गटातील नेत्यांच्या जवळील व्यक्तींच्या कार्यालयावर छापा टाकला असून त्याचबरोबर इतर १५ ठिकाणी छापे टाकले आहेत.

ईडीने (ED) बुधवारी कोविड सेंटरच्या गैरव्यवहारप्रकरणी ठाकरे गटातील नेत्यांच्या जवळील व्यक्तींच्या कार्यालयावर छापा टाकला असून त्याचबरोबर इतर १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. ठाकरे गटातील संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिव चव्हाण यांच्या घरी व कार्यालयात ईडीकडून छापे टाकण्यात आले. तसेच सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल यांच्या राहत्या घरी देखील ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण छापेमारीतून काय हाती लागले आहे या सर्व गोष्टींचा आढावा घ्यावा लागणार आहे. सुरज चव्हाणांसोबतच सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल यांच्या घरी ईडीकडून अनेक तास छापेमारी करण्यात आली. ईडीची छापेमारी ही सुरज चव्हाण यांच्या घरी तब्बल १३ तास चालू होती. तसेच संजीव चव्हाण यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी पाच तास सुरु होती. मात्र या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुरज चव्हाण आणि सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल यांचा नेमका काय संबंध?

ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार संजीव जैयस्वाल हे लाईफलाईन हॉस्पिटलच्या डेंड्र बोलीच्या वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त होते. तसेच संजीव जैयस्वाल हे मुख्यत्वे ज्यांनी लाईफलाईन हॉस्पिटलला मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला टेंडर दिलं अश्या स्थापन करण्यात आलेल्या समितीचा एक भाग होते. कंपनीचा अनुभव आणि पात्रता लक्षात घेऊन त्यांना कंत्राट देणं हे अनिवार्य होतं मात्र टेंडर देण्यात आलेल्या कंपनीला फारसा अनुभव तसेच रुग्णांच्या देखभाली साठी लागणारे मनुष्यबळ आणि योग्य ते साहित्य उपलब्ध नसतानासुद्धा त्या कंपनीला टेंडर देण्यात आलं असे तपासात आढळून आले. याबद्दल संजीव जैयस्वाल यांची ईडीकडून चौकशीकरण्यात येत आहे. तसेच संजीव जैयस्वाल यांच्यासोबत इतर काही महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांच्या निवास्थानी देखील ईडीकडून छापेमारी करण्यात आली. ईडीकडून बीएमसीचे (BMC) वैद्यकीय अधिकारी यांच्यावरही छापे टाकले आहेत. तसेच महानगर पालिका उपयुक्त रमाकांत बिरादार यांच्या देखील घरी ईडीने छापे टाकले.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाईफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून काही सब टेंडर देण्यात आलं आहे त्यामध्ये वैद्यकीय साहित्य त्याचबरोबर वैद्यकीय देवा पुरवण्याचे सब टेंडर होते. सुरज चव्हाण यांचा या टेंडरशी संबंध येतो. म्हणूनच या टेंडरमध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे का तसेच आर्थिक व्यवहार करताना काही नियम मोडले आहे का त्याचबरोबर या संबंधित कुठलाही गैरव्यवहार झाला आहे का या संपूर्ण प्रकारची दाटुन चौकशी करण्यात येणार आहे.

Latest Posts

Don't Miss