पुण्यातील गुंडांच्या दादागिरीच्या घटना वाढल्या आहेत. नुकतीच पुण्यातील सहकार नगर परिसरात काही गुंड्यानी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. मात्र अजूनही गुंडांची दादागिरी बंद न झाल्याचे दिसून येते. त्याचे कारण म्हणजे आता सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणखी एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की चक्क काही गुंडांच्या टोळीने भररस्त्यात गाडी आडवी लावून तलवारीने केक कापला. ही अतिशय भयानक घटना बुधवारी रात्री पुण्यातील सहकार नगर परिसरात घडली आहे. या गुंडांनी तलवारीने केक कपात मोठ्या प्रमाणात दंगा केला. रात्रीच्या वेळी जोरजोरात आरडाओरड करून धिंगाणा घातला. म्हणूनच या परिसरात काही काळ भीतीचे वातावरण तयार झाले होते. म्हणूनच या परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून सहकार नगर पोलिसांचा गुंडांवर वचक राहिला आहे की नाही असे प्रश्न नागरिकांकडून केले जात आहेत. पुण्यात मागील महिन्यांपासून तलवारीने केक कापण्याचे प्रमाण वाढले आहे. वस्तीमध्ये रात्रीच्यावेळी फटाके लावून तसेच रस्त्यात तलवारीने केक कापून जन्मदिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. गुंडांकडून असे प्रकार वारंवार केले जातात. अशाप्रकारे वाढदिवस साजरे केले जाऊ नये यासाठी पोलिसांकडून समज देण्यात येते तरी देखील असे प्रकार सतत घडत आहेत.
वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापण्याची अशीच एक घटना फेब्रुवारीमध्ये इंदापूर येथे घडली होती. वाढदिवसादिवशी तलवारीने केक कापणं एका तरुणाला महागात पडलं होत. त्या तरुणाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या इंदापूरच्या तरुणाने वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापला होता. तलवारीने केक कप्तानाचे फोटोज या तरुणाने सोशल मीडियावर टाकले होते. त्यामुळे सोशल मीडियावर या तरुणाचे फोटोज प्रचंड वायरल झाले होते. म्हणूनच पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाली होती. म्हणूनच तातडीने पोलिसांनी या तरुणाचा शोध घेत त्याच्या घराची तपासणी केली. या तपासणी मध्ये तरुणाच्या घराच्या मागील भागात तलवार आढळली. आणि पोलिसांनी या तरुणाला अटक केली.
तसेच नुकतीच पुण्यात गुंडांकडून गाड्यांची तोडफोड करण्याची घटना समोर आली होती. पुण्यातील तुळजाई परिसरात मंगळवारी पहाटे ३० गाड्यांची तोडफोड करण्यात आली. ही तोड फोड सहा जणांनी तोंडावर रुमाल बांधून धुडगूस घातली होती. या परिसरातील गन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या वाघमारे आणि त्यांच्या टोळक्यांनी या वाहनांची तोडफोड केल्याचे आढळून आले. या टोळीचे तीन हत्ती चौकात एका टोळीसोबत भांडण झाले होते. म्हणूनच वाघमारे आणि त्यांच्या टोळक्यांनी सहकारनगर भागातील वाहनांची तोडफोड केली. म्हणूनच पोलिसांनी वाघमारेला ताब्यात घेऊन त्याला चांगलाच दम दिला.
हे ही वाचा:
Ashadhi Wari, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने केला आज २० दिवसांचा टप्पा पूर्ण
‘नीयत’ चित्रपटाचा टीजर आणि पोस्टर प्रदर्शित