spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रियांका गांधी यांना पोलिसांनी फरफटत घेतलं ताब्यात, महागाई विरोधात देशव्यापी आंदोलन

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात वाढती महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ योजना इतर समस्यांबाबत काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरु आहे. आज महाराष्ट्र राज्यात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप यांच्या उपस्थितीत आज सकाळी आंदोलनाला सुरुवात झाली. कमला नेहरू पार्क हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत मोर्चा काढून राजभवनाचा घेराव आणि जेलभरो आंदोलन करण्यात आले परंतु मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे आंदोलनकर्त्यांना पुढे जाऊन दिले नाही. आणि नेत्यांसाहित कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी अटक केले आहे.

 काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावले ते भाजपनं 7 वर्षात गमावले, राहुल गांधींची मोदींवर टीका

तर दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींपासून खासदार राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींपर्यंत सर्वच नेते रस्त्यावर आंदोलनासाठी उतरले आहेत. दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी फरफटत,ओढत ताब्यात घेतले आहे. सध्या हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. राहुल गांधी यांना देखील पोलिसांनी पीएम हाउस येथे जाण्यापासून आढवला आहे. आणि ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : 

मुंबईतून काँग्रेस आक्रमक, पोलिसांकडून बड्या नेत्यांना अटक

महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसच्या वतीने देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. तत्पूर्वी, पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सरकार हुकूमशाही असल्याचा आरोप करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. संसदेत बोलू दिले जात नाही, असे ते म्हणाले. अटक केली जात आहे. देशातील लोकशाही संपत असताना तुम्हाला कसे वाटते, असे राहुल म्हणाले.

Latest Posts

Don't Miss