spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai सह राज्यातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. परंतु आता हवामान विभागानं (imd) दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक ठिकाणी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. परंतु आता हवामान विभागानं (imd) दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक ठिकाणी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. राज्यात रिमझिम पावसाच्या सारी या बरसू लागल्या आहेत. मुंबईतील काही भागांमध्ये देखील पावसाने त्याची हजेरी ही लावली आहे. पावसाच्या सरी या बरसल्या आहेत त्यामुळे आता हळू हळू का होईना उष्णतेपासून नागरिकांना दिलासा नक्कीच मिळेल. गेल्या अनेक दिवसांपासून बळीराजा देखील पावसाच्या प्रतीक्षेत होता. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

उष्णतेमुळं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. कारण मुंबईत अखेर पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस झाला. तसेच ठाणे,नवी मुंबईच्या परिसरात देखील पावसानं हजेरी लावली. तसेच “पश्चिमी वाऱ्यांचा जोर वाढला असल्याने १-२ दिवसांत पावसाचा जोर वाढू लागेल. मुंबईत २ दिवसांत पावसाला सुरुवात होणार आहे . त्यानंतर, महाराष्ट्राच्या आतील भागातही पावसाचा जोर वाढेल,” असे भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्याने सांगितले. IMD ने २३ जून ते २५ जून दरम्यान मध्यम पावसाचा (ग्रीन अलर्ट) अंदाज वर्तवला आहे, त्यानंतर मुसळधार पाऊस आणखी तीव्र होईल. “शहरातील काही भागात शुक्रवारी झालेला विखुरलेला पाऊस हा मान्सूनपूर्व सरी होता. २६ जून आणि २७ जून रोजी निर्जन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे,” सुषमा नायर, भारतीय हवामान विभाग (IMD) च्या कुलाबा येथील प्रादेशिक केंद्राच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

मुंबईसह राहातील इतर भागामध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह पंढरपूर, रत्नागिरी, यवतमाळ, गडचिरोली मध्ये देखील पावसाच्या सरी या बरसल्या आहेत. पुढच्या आठवड्यात सर्वत्र जय जय राम कृष्ण हरी चे बोल ऐकू येतील. आषाढी वारीचा सोहळा हा सर्वत्र साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वीच पंढरपूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. मात्र, पाऊस सतत हुलकावणी देत असल्यानं शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.

हे ही वाचा:

साऊथ सुपरस्टार विजयच्या ‘Leo’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसीय अमेरिका दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss