spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लवकरच, लवकरच, लवकरच… म्हणत अजित पवारांचा मंत्रिमंडळाबाबत राज्य सरकारवर निशाणा

पुणे : राज्यातील सत्तासंघर्ष संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने टीका होत आहे. आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एका सभेत राज्य सरकारवर निशाणा साधत राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत टोला लगावला आहे.

अजित पवार यांनी म्हटले, “मंत्रिमंडळाच्या विस्तारा संदर्भात विचारले असता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तोंडातून लवकरच, लवकरच, लवकरच इतकेच शब्द येत आहेत. होईल, होईल.. पण कधी होईल याचे उत्तर यांच्याकडे नाही. इतक्या मोठ्या महाराष्ट्रात चांद्यापासून ते बांद्यापर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. अतिवृष्टी, पाऊस, शिक्षणाशी संबंधित पालक आणि विद्यार्थ्यांसमोरील अडचणी आहेत याची जबाबादारी कोण घेणार ? असा प्रश्न अजित पवार यांनी या प्रसंगी उपस्थित केला आहे.

पुढे अजित पवार यांनी म्हटले, “आज यांच्या हातात काहीच नाही. जो पर्यंत दिल्लीतून सिग्नल येत नाही तो हे काहीच करू शकत नाही. आम्ही दोघे आहोत अस म्हणून काय होत नाही. जनतेचे प्रश्न असंख्य आहेत ते तुम्ही सोडवू शकत काही. असा खोचक टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लगावला आहे.

हेही वाचा : 

वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल, अनोळखी व्यक्तीशी व्यवहार केल्या प्रकरणी आरोप

Latest Posts

Don't Miss