spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘Sukh Mhanje Nakki Kay Asta’ या मालिकेतील फिटनेस फ्रिक अभिनेत्री बद्दल तुम्हाला माहित आहे का?

यापूर्वी माधवी ने अनेक वेळा फणसातील गरे काढणे, चुल पेटवणे यांसारखी कामं करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांना प्रचंड आनंद देतात. आपल्या आवडत्या मालिकेच्या पुढच्या भागात काय घडणार यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात उत्सुक असतात. छोट्या पडद्यावरील मालीकेतील कलाकार हे चाहत्यानां आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखेच असतात. सध्या अशीच एक मालिका चाहत्यांच्या मनात घर करतेय ती म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta). या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर शालिनी ही भूमिका साकारते. शालिनी ही फक्त जयदीप आणि गौरीला त्रास देण्याचे काम करत असते. परंतु शालिनी ही भूमिका साकारणारी माधवी निमकर (Madhavi Nimkar) ही खऱ्या आयुष्यात फार वेगळी आहे. चला तर तिच्या बद्दल जाणून घेऊयात.

अभिनेत्री शालिनी निमकर मल्टी टॅलेंटेड असून प्रचंड फिटनेस फ्रीक आहे. माधवी ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. तसेच अभिनेत्री माधवी निमकर ही सोशलमीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्री सतत आपल्या चाहत्यांना स्वतःबद्दलच्या अपडेट्स देत असते. तसेच माधवी ही नेहमी वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. माधवी नियमित योगा सुद्धा करते.

यापूर्वी माधवी ने अनेक वेळा फणसातील गरे काढणे, चुल पेटवणे यांसारखी कामं करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनयक्षेत्रात काम करत असतानाच माधवी ही इतर कामं देखील आवडीनं करते. अनेकांच्या मनात आपलं घर निर्माण करणारी अभिनेत्री माधवी खलनायिकेंच्या भूमिकांसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. माधवीने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

हे ही वाचा : 

पंढरपूरच्या वारीला मटनाचा शाही बेत? मुख्यमंत्री KCR यांच्यावर अमोल मिटकरी यांचा गंभीर आरोप

पंढरपूरच्या वारीला मटनाचा शाही बेत? मुख्यमंत्री KCR यांच्यावर अमोल मिटकरी यांचा गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss