spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार, तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नागपूर : भंडारा जिल्ह्यात एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीत महिलेवर तीन नराधमांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले. आरोपींनी महिलेल्या रस्त्याकडेला फेकून देत तिथून फरार झाले. सध्या महिलेवर नागपूर एका वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.

या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री यांनी प्रतिकिया दिली की, “पिढीत महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आरोपींना सोडले जाणार नाही. माझी पोलीस महासंचाल यांच्याशी देखील चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले, अद्याप पोलिसांनी 2 आरोपींना अटक केले आहे. तर एक आरोपी फरार असलायचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नेमके काय घडले ?

पीडित महिला आपल्या पतीपासून वेगळी झाली होती. काही दिवसांआधी ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. दरम्यान, 30 जुलैला बहिणीसोबत वाद झाल्याने तिनं रात्रीच्या सुमारास घर सोडले व ती गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्यासाठी ती निघाली. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवलं. पण या नराधमानं पुढे तिला घरी सोडलंच नाही, तर गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या नराधम व्यक्तींनी दुसऱ्या दिवशीही  31 जुलैला पळसगाव जंगलात नेऊन पिढीत महिलेवर अत्याचार पुन्हा केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीनं पळ काढला.

त्या नंतर पिढीत महिलेणनं शारीरिक दुखन सहन करत कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीकडे मदत मागितली. व त्या अज्ञात व्यक्तीने महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्याने पीडितेवर अत्याचार केले. आरोपीने आपल्या एका मित्राला सोबत घेत 1 ऑगस्ट रोजी वारंवार अत्याचार केला. आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती.

हेही वाचा : 

शिवसेना – भाजप युती सरकारला जनतेचा कौल , मुख्यमंत्र्यांचे ट्विट वायरल

Latest Posts

Don't Miss