spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ईद साजरी करण्यासाठी आणलेल्या बकऱ्यावरून सोसायटीतील सदस्यांमध्ये वाद

या गदारोळात लोकांनी हनुमान चालिसा पाठणही सुरू केले आणि जय श्री रामच्या घोषणा सुद्धा दिल्या. काशिमीरा (Kash Mira) पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण एकाच दिवशी आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील मीरारोडमधील हायफाय सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मीरारोड ईद साजरी करण्यासाठी इमारतीत आणलेल्या बकऱ्यांवरून वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. घडलेल्या संपूर्ण प्रकारामध्ये पोलिसांनी कारवाई केली असून सध्या शांतता निर्माण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीत राहणारे मोहसीन शेख (Mohsin Sheik) यांनी बकरी ईदनिमित्त सोसायटीत दोन बकरे आणले होते. ही बाब सोसायटीत समजल्यानंतर सोसायटीतील काही लोकांनी सोसायटीत एकत्र येत या गोष्टीचा तीव्र निषेद केला. बकऱ्याला बाहेर काढा अशी सोसायटीतील लोकांनी मागणी सुरु केली. तसेच या गदारोळात लोकांनी हनुमान चालिसा पाठणही सुरू केले आणि जय श्री रामच्या घोषणा सुद्धा दिल्या. काशिमीरा (Kash Mira) पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तसेच इमारतीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला. सोबतच डीसीपी जयंत बजबळे (Jayant Bajbale) यांनी इमारतीतील लोकांची समजूत काढली आणि राग शांत केला.

अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाने हिंदू मुस्लिम बांधवांची बैठक घेऊन त्यांना बकरी ईदच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या. मात्र बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने सर्व मुस्लिम बांधवांनी स्वखुशीने त्यांची बकरी ईदची कुर्बानी आषाढी एकादशीच्या दिवशी न देता एकादशीच्या दुसऱ्या दिवशी देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. तसेच त्या आषाढी एकादशीच्या दिवशी मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. धर्माच्या नावावर हिंसा भडकावणाऱ्यांनी यातून शिकवण घेण्यासारखे आहे.

हे ही वाचा : 

शिंदे सरकारने घेणतला मोठा निर्णय, Versova-Bandra Sea Link चे नाव बदलले, आता…

संभाजी भिडेंना अटक व्हायलाच हवी, छगन भुजबळांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss