spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

BREAKING, Aditya Thackeray यांच्या कारला बाईकची धडक!

सध्या एकीकडे राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी या होत आहेत तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण हे वाढत चालले आहे.

सध्या एकीकडे राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी या होत आहेत तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण हे वाढत चालले आहे. अशातच नुकतीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीला एक बाईक धडकली आहे. मुंबईमधील शिवसेना भवनसमोर ही घटना घडली आहे. सध्या या बाईकस्वाराची पोलिसांकडून कसून चौकशी ही सुरु आहे.

आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे शिवसेना भवन येथे येत होते. आदित्य ठाकरे शिवसेना भवनसमोर दाखल झाले होते. यावेळी त्यांचा ताफा शिवसेना भवनच्या दिशेला टन घेत होता. आणि नेमकी त्याच वेळी मागून येणाऱ्या बाईकने आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडक दिली. मुळात या धडकेनंतर आदित्य ठाकरे यांनी स्वत: त्या बाईकस्वाराची विचारपूस केली. बाईकस्वाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या गाडीला देखील खरचटलं आहे.

तसेच या मिळालेल्या माहितीनुसार, बाईकस्वार हा गाडीला धडकल्यानंतर पोलिसांच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या अंगरक्षकांनी त्या बाईकस्वाराला पकडलं. त्याला रस्त्याच्या बाजूला नेलं. तसेच आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याला जाण्यासाठी रस्ता मोकळा केला. तसेच इतर वाहतूक सुरळीत केली. या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी बाईकस्वाराची विचारपूस देखील केली. आदित्य ठाकरे पुढे निघून गेल्यानंतर पोलिसांकडून या बाईकस्वाराची चौकशी सुरु आहे.

तसेच या अपघातानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या घटनेवर स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना नॉर्मल होती, असं ते म्हणाले आहेत. पण संबंधित घटनेमुळे तिथे जमलेल्यांचा नागरिकांचा काही क्षणासाठी श्वास रोखला गेला होता. कारण आदित्य ठाकरे हे तरुण आणि धडाकेबाज नेते आहेत. त्यांच्या वडिलांचं, आजोबाचं आणि पंजोबाचं मुंबई आणि राज्यासाठी मोठं योगदान आहे. तसेच ते स्वत: मंत्री होते. त्यामुळे त्यांच्यासोबत अशी काही घटना घडली की नागरिकांना धडकी भरणं साहजिकच आहे.

हे ही वाचा:

Mahendra Singh Dhoni साठी लिहिलं चक्क रक्ताने पत्र !

बकरी ईदनिमित्त नाशिकच्या ‘या’ मार्गावरुन वाहतूक बंद!

पुण्यामध्ये हल्ला झालेल्या घटनेवरून अजित पवार संतापले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss