spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

’72 Hoorain’, सेन्सॉर बोर्डकडून चित्रपट रिजेक्ट, निर्माते म्हणाले ….

गेल्या काही काळापासून चित्रपट क्षेत्रात अनेक वाद विवाद चालू आहेत. ‘द केरला स्टोरी' नंतर आता नव्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. धर्मांतर, दहशतवाद ,खोटा आशावाद यांवर आधारित या चित्रपटाला आता सेन्सॉर बोर्डने (sensor board) अमान्यता दिली आहे.

गेल्या काही काळापासून चित्रपट क्षेत्रात अनेक वाद विवाद चालू आहेत. ‘द केरला स्टोरी’ नंतर आता नव्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. धर्मांतर, दहशतवाद ,खोटा आशावाद यांवर आधारित या चित्रपटाला आता सेन्सॉर बोर्डने (sensor board) अमान्यता दिली आहे. या चित्रपटात हकीम अलीच्या भूमिकेत पवन मल्होत्रा ​​आणि बिलाल अहमदच्या भूमिकेत आमीर बशीर आहे.हूरेंच्या कुराणिक संकल्पनेवर आधारित, हा चित्रपट धार्मिक दहशतवादाच्या संदर्भात ब्रेनवॉशिंगची भूमिका एक्सप्लोर (explore) करतो, विशेषत: जिहादच्या नावाखाली आत्मघाती हल्ले करणार्‍या विश्वासणार्‍यांसाठी “स्वर्गातील ७२ कुमारिका” हे शीर्षक वचन आहे.यात दहशतवादी संघटना निष्पाप मुस्लिम तरुणांना जन्नत आणि स्वर्गीय कुमारी यांचे आश्‍वासन देऊन गैर-मुस्लिमांवर हल्ले करण्यास कसे पटवून देतात हे चित्रण केले आहे आणि “हिंसक अतिरेकीपणाचे परिणाम” चित्रित केले आहेत.

सोशल मीडियावर या चित्रपटाची खूप जास्त चर्चा होत आहे. हा चित्रपट प्रथम फक्त हिंदी भाषेत येणार होता पण नंतर निर्मात्यांनी हा चित्रपट १० भाषेत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा चित्रपट हिंदी, इंग्रजी ,आसामी, बंगाली, भोजपुरी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, पंजाबी, तमिळ आणि तेलगू.या भाषांमधे प्रदर्शित होण्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. त्यातच आता चित्रपटाचा ट्रेलर पास करण्यास सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे निर्माते या निर्णयावर संतापले असून या निर्णयाविरोधात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे जाण्याच्या तयारीत ते आहेत.

चित्रपटाचे सहनिर्माते अशोक पंडित यांचीही प्रतिक्रिया आता समोर अली आहे .एनएनरने (NNR)शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “आम्ही एका मृतदेहाचे पाय दाखवले आहेत, ते सीबीएफसीने (CBFC) हटवण्यास सांगितले आहे. कुराणचा संदर्भ काढून टाकण्यास सांगितले आहे. हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आहे. तुम्ही चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र जारी केले आहे. तेच सीन्स ट्रेलरमध्ये आहेत मग तुम्ही ट्रेलर कसा रिजेक्ट करू शकता? आम्ही ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर (Digital platforms) रिलीज करू. आधी आम्ही तो पीव्हीआरमध्ये (PVR) रिलीज करणार होतो, पण आता अंधेरीच्या क्लबमध्ये रिलीज करणार आहोत.”पुढे ते म्हणाले, तिथे बसलेले हे लोक कोण आहेत ?ही एक अतिशय गंभीर बाब आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या ट्रेलरचा प्रमाणपत्र नाकारण्याच्या या निर्णयाची जबाबदारी सीबीएफसीच्या (CBFC) सर्व अधिकाऱ्यांकडे आहे. या चित्रपटाला इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात पुरस्कार मिळाला आहे. अशा या चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र तुम्ही कसे नाकारू शकता? सेन्सॉर बोर्डात काहीतरी गडबड आहे आणि त्याला प्रसून जोशी जबाबदार आहेत.”

सीबीएफने या चित्रपटाला आधीच मान्यता दिली होती, पण आता या चित्रपटाच्या ट्रेलरला नकार दिल्याने निर्मात्यांना धक्का बसला आहे आणि म्हणूनच ते संतापले आहेत. ७२ हूरें या चित्रपटाचा ट्रेलर आज २८ जून रोजी प्रदर्शित होणार होता. तसेच हा चित्रपट ७ जुलै रोजी प्रदर्शित केला जाणार होता.

हे ही वाचा:

चित्रपट हिट करण्यासाठी या नायकाने केली सगळी नौटंकी, व्हिडिओमुळे झाला Troll

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्या लोकार्पण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss