spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कंगनाच्या ‘Chandramukhi-2’ चित्रपटाची रिलिज डेट जाहीर, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

स्पष्टव्यक्ती आणि तडफदार व्यक्तिमत्व असणारी अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कॉंट्रोव्हर्सीइजच्या (Controversies) विळख्यात असते. त्यातच आता कंगना तिच्या चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे.

स्पष्टव्यक्ती आणि तडफदार व्यक्तिमत्व असणारी अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कॉंट्रोव्हर्सीइजच्या (Controversies) विळख्यात असते. त्यातच आता कंगना तिच्या चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती (produce) कंगनाने (Kangana) केलेली आहे. त्यातच आता लवकरच तिचा ‘चंद्रमुखी २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाने नुकतेच चंद्रमुखी २ या चित्रपटचे पोस्टर (poster) सोशल मीडियावर (social media) शेअर केले आहेत. या फोटोज बरोबरच तिने चित्रपटाच्या रिलीज डेटचीही (Release date) घोषणा केली आहे.

कंगनाने (Kangana)सोशल मीडियावर (social media) ‘चंद्रमुखी २’चे पोस्टर शेअर केले आहे. चंद्रमुखी २ हा चित्रपट सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थीच्या विशेष मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची माहिती कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन कंगनाने कॅप्शनमध्ये (caption) लिहिले आहे की, ‘ती या सप्टेंबरमध्ये परत येत आहे… तुम्ही तयार आहात का?’

चंद्रमुखी २ हा चित्रपट पी. वासू यांनी दिग्दर्शित केला असून यात राघव लॉरेन्स हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबतच कंगना (Kangana)देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच वाडीवेलू आणि इतर कलाकार या चित्रपटात दिसतील. लायका प्रॉडक्शन (Laika Productions) आणि सुबास्करन निर्मित हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड या भाषेत प्रदर्शित होणार आहे. कंगनाचे अनेक चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

चंद्रमुखी २ हा चित्रपट तामिळ सुपरस्टार रजनीकांतच्या चंद्रमुखी या ब्लॉकबस्टर हॉरर-कॉमेडी(Horror-comedy) चित्रपटाचा सिक्वेल असेल असे म्हटले जात आहे.या चित्रपटाचे शूटिंग (shooting) पूर्ण झाले असून या चित्रपटामध्ये नक्की काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.या चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

हे ही वाचा:

Bank Holidays in July 2023, यंदा जुलै महिन्यात अर्धा महिना राहणार बँका बंद!, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

सोलापुरात चक्क ‘Love Pakistan’ संदेश असलेल्या फुग्यांची विक्री, ईदच्या दिवशी शांतता भंग करण्याचा उद्देश ?

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss