spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संध्याकाळी भारताचे नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

मुंबई : – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संध्याकाळी भारताचे नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही धनखड यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत धनखड यांना विजयी घोषित केल्यानंतर लगेचच या बैठका झाल्या. जगदीप धनखड यांना ५२८ तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली.

याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. या निवडणुकीत जगदीप धनखड५२८ मतांनी विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण ७२५ मतं पडली. त्यापैकी ७१० मतं वैध तर १५ मतं ही अवैध आढळून आली. आता जगदीप धनखड हे देशाचे १४ वे उपराष्ट्रपती असतील. धनखड देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून ११ ऑगस्टला शपथ घेतील. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे. लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी दिलेल्या माहतीनुसार, धनखड यांना ७२५ मतांपैकी ५२७ मतं मिळाली. ३४६ मतांनी त्यांचा विजय झाला आहे. तर १५ मते अवैध ठरली आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२ मतं मिळाली. उपराष्ट्रपतीपदासाठी ९२.९४ टक्के मतदान झालं आहे.

तर टीएमसीच्या ३४, भाजपच्या दोन, शिवसेनेच्या दोन आणि बीएसपीच्या एका खासदाराने मतदान केले नाही. सनी देओल विदेशात आणि संजय धोत्रे हॉस्पिटलमध्ये असल्यानं मतदान केले नाही. शिवसेनेकडून अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन कीर्तीकर, संजय जाधव, राजन विचारे हे देखील मतदानासाठी अनुपस्थित होते. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह गृहमंत्री अमित शहा यांनी देखील जगदीप धनखड यांचे अभिनंदन केले आहे. तर अमित शहा असे देखील म्हणाले, “शेतकरी पुत्र जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपतीपदी निवड होणं ही संपूर्ण देशासाठी आनंदाची बाब असल्याचं अमित शहा म्हणाले. प्रदीर्घ काळापासून सार्वजनिक जीवनात ते जनतेशी जोडले गेले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा वरिष्ठ सभागृहाला नक्कीच होईल.”

 

हे ही वाचा :-

SSLV D1-EOS-2 Launched : इस्रोच्या “बेबी रॉकेट” चे यशस्वी उड्डाण

Latest Posts

Don't Miss