मुंबई : – अंधश्रद्धेच्या भुतामुळे नागपूरमध्ये एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. पाच वर्षाच्या चिमुकलीला जन्मदात्याने मायबापानीच संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपूर शहरातील राणा प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत ही भयंकर घटना घडली. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी आईवडिलांसह तीन जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ५ वर्षाच्या मुलीला भूताने पछाडल्याचा संशय तिच्या जन्मदात्या आईवडिलांना आला. त्यांनी भूताला पळवून लावण्यासाठी मुलीला मारलं. या बेदम मारामुळे मुलीचा मृत्यू झाला. शुक्रवार आणि शनिवारी रात्री पालकांनी काळ्या जादूच्या नावाखाली मुलीला मारहाण केली होती. यातील सर्व भयंकर प्रकार म्हणजे हा सर्व प्रकार त्यांनी त्यांच्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद केला आहे. पोलिसांनी आरोपींचा मोबाईल जप्त केला आणि मोबाइलमधून हा व्हिडीओ मिळवला आहे. घटनेनंतर पोलिसांनी मयत मुलीच्या आईवडिलांसह अन्य एका व्यक्तीला अटक केली आहे.
मुलीच्या आई, वडिल आणि मावशीने मिळून काळी जादू केली आणि हि काळी जादू करत असताना तिघांनीही मुलीला अनेकदा कानाखाली मारली, तसंच मारहाण केली. यानंतर मुलगी बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळली असं पोलिसांनी सांगितलं आहे. यानंतर आरोपीने मुलीला शनिवारी सकाळी दर्ग्यात नेलं. नंतर तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा पूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता. आरोपी आई-वडील एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपण पकडले जाऊ या भीतीने मुलीचे मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात ठेवून तिथून पळ काढले. डॉक्टरांनी मुलीला घोषित करुन पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत हे मृतदेह या ठिकाणी कोणी आणून ठेवले याची माहिती मिळवली. मृतदेह कोणत्या गाडीतून त्या ठिकाणी आणण्यात आले त्या गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा शोध लावला
हे ही वाचा :-
सर्व माहिती असूनही डायलॉग बाजी का ? अजित पवारांना फडणवीसांचा प्रश्न