spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्राचे दोन “अनमोल रत्न” – अमृता फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना पक्ष या दोघांमधील वाद हा नवीन नाही.

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना पक्ष या दोघांमधील वाद हा नवीन नाही. नुकतेच अमृता फडणवीस यांनी छोट्या पडद्यावरील बस बाई बस (Bus Bai Bus) या मालिकेत आपली हाजरी लावली होती. या दरम्यान त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे याना खोचक टोला दिला आहे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यांवर किशोरी पेढणेकर यांनी देखील त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.

तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसापासून मंत्री मंडळाचा विस्तार हा रखडला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली वाऱ्या देखील लागोपाठ सुरूच आहेत. परंतु आज फ्रेंडशीप डेच्या औचित्य साधून अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट एकी आहे. त्या पोस्ट त्यांनी #friendshipday हॅशटॅग करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्ट करताना म्हटले आहे की, ये दोस्ती हम नही तोड़ेंगे, महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना टॅग केले आहे. सोबत #friendshipday, #friendship, #friends, #sundayvibes, #maharashtra असे हॅशटॅग वापरले आहेत.

तर बस बाई बस या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना ‘कशी नशिबान थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकवलं. गाणं ऐकल्यानंतर कोणत्या व्यक्तीचं नाव समोर येतं? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. हे गाणं ऐकल्यानंतर अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले होते.

त्यांच्या या खोचक वक्तव्यांवर किशोरी पेढणेकर यांनी देखील टोला लगावला आहे. त्यांनी एका गण्या मार्फत त्यांना टोला लगावला…
अशी कशी नशिबान थट्टा मांडली.
एक होता निर्मळ माणूस, देवेंद्र त्याचे नाव
मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थान केले हो,
एका ‘अमृताची’ दृष्ट त्यांना लागली
त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रीपद आले
अशी कशी नशिबानं थट्टा मांडली…

हे ही वाचा :-

सर्व माहिती असूनही डायलॉग बाजी का ? अजित पवारांना फडणवीसांचा प्रश्न

Latest Posts

Don't Miss